Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या (Trimbakeshwar Police Station) हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत ११ आरोपींना अटक केली आहे. डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीस गेलेला ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या ...
नेमकं काय घडलं ?
२६ जुलै रोजी पहाटे सुमारे ३ वाजता तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळील आवारात १० ते १२ जणांच्या टोळीने प्रवेश केला. आरोपींनी साइट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे आणि इतर कर्मचाऱ्यांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर व कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर मोबाईल फोन, इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये वापरले जाणारे SQMM कंडक्टर वायर आणि इतर साहित्य लुटून आरोपी पसार झाले. याबाबत फिर्यादी यांनी तात्काळ डायल ११२ प्रणालीवर संपर्क करत याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात ११ संशयित आरोपींना अटक केली आहे. (Nashik Crime News)
Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ, रेल्वे, स्वयंसेवक आणि गर्दी व्यवस्थापन ...
११ संशयित जेरबंद
यामध्ये मनीष मदन सिंग (२१), रोहन खंडू पाटील (३०), योगेश कुमार सिताराम कुमार (३४), गणेश कैलास कोतारे (१९), अर्थव संजय सारुक्ते (१९), समाधान शिवाजी मालुंजकर (१८), पियुष अंबादास गवते (१८), कुणाल शरद चोथे (१९), शेखर जीवन अस्वले (१६), अजय जीवन चोथे (१९), मनोज शांताराम मुर्तडक (२०) या संशयित आरोपींकडून चोरीस गेलेले SQMM कंडक्टर वायर, ५ मोबाईल फोन, तांब्याचे वायर, तलवारी, कुऱ्हाडी, कोयते, कटर, स्क्रू ड्रायव्हर तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस (Trimbakeshwar Police) पुढील तपास करत आहेत.




