Ranbir Kapoor : 'रामायण'नंतर रणबीर कपूर 'धूम ४'मध्ये दिसणार का ? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा

मुंबई:
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' या भव्य चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान श्रीरामांची भूमिका साकारत असून दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यशराज फिल्म्सच्या 'धूम ४'(Dhoom 4) या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता रणबीरने स्वतः या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.



सॅन डिएगो कॉमिक कॉनमध्ये खुलासा:
रणबीर कपूर अलिकडेच 'रामायण' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत 'सॅन डिएगो कॉमिक कॉन'(San Diego Comic-Con) येथे गेला होता. या दरम्यान 'रिव्ह्यू नेशन'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याला 'धूम ४'बाबत विचारणा करण्यात आली.
मुलाखतीत जेव्हा विचारले गेले की, यश त्याच्या 'टॉक्सिक' या आगामी चित्रपटात काम करत आहे आणि रणबीर 'धूम ४' मध्ये दिसणार आहे का? यावर रणबीरने त्वरित उत्तर देत सर्व चर्चा फेटाळून लावल्या.



रणबीरने काय सांगितले?
'धूम ४'मधील सहभागावर स्पष्टीकरण देताना रणबीर कपूर म्हणाला, नाही, मी 'धूम ४' मध्ये नाहीये. मी सध्या केवळ 'रामायण' आणि संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या सिनेमांमध्येच व्यस्त आहे. संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' हा सिनेमा २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
रणबीर कपूरच्या या स्पष्टीकरणानंतर तो 'धूम ४' चा भाग नसल्याचे निश्चित झाले असून त्याच्या नावाबद्दल सुरु असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता