मुंबई : मराठी प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हास्याचा जल्लोष घेऊन येत आहे. 'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला कुशल आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Kushal Badrike In MHJ) या लोकप्रिय शोमध्ये विशेष पाहुणा म्हणून झळकणार आहे. सोनी मराठीने नुकताच याचा प्रोमो प्रदर्शित केला असून, त्यात कुशलची धमाकेदार एन्ट्री पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्टायलिश एन्ट्री आणि विनोदाची फुल ऑन मेजवानी :
प्रोमोमध्ये अरुण कदम, प्रियदर्शिनी इंदलकर आणि श्रमेश बेटकर यांची भन्नाट कॉमेडी सुरू असतानाच कुशल बद्रिकेची स्टायलिश एन्ट्री होते. त्यानंतर प्रियदर्शिनीसोबत त्याचा हलकाफुलका संवाद रंगतो, तर दत्तू मोरे आणि कुशल बद्रिके यांची विनोदी जुगलबंदी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. दोघांचं अचूक कॉमिक टायमिंग पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. (Kushal Badrike In MHJ)
मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लागल्याची माहिती मिळाली असून, ...
'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या प्रमोशनसाठी खास उपस्थिती :
कुशल बद्रिके (Kushal Badrike In MHJ) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये कायमस्वरूपी सहभागी होत नसून, तो आपल्या आगामी 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विशेष पाहुणा म्हणून शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर कलाकारही मंचावर दिसणार आहेत.
या चित्रपटात अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि कुशल बद्रिके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेत्री नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचाही ग्लॅमरस अंदाज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विजू माने दिग्दर्शित हा बहुचर्चित चित्रपट ३१ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Kushal Badrike In MHJ)
मुंबई : 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ...
चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला :
'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिकेला पुन्हा एका लोकप्रिय कॉमेडी शोच्या मंचावर पाहण्याची संधी मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः दत्तू मोरे आणि कुशल बद्रिके यांची कॉमिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खळखळून हसवणार, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (Kushal Badrike In MHJ)
View this post on Instagram





