Wi-Fi Speed : नेटवर्कच्या समस्येला कंटाळला आहात? वायफायचा वेग वाढवण्यासाठी करा हे ४ घरगुती उपाय

ॲल्युमिनियम फॉइल वापरून आपल्या घरातील Wi-Fi चा स्पीड कसा वाढवतात?


नेटवर्कच्या त्रासाला कंटाळून, बहुतेक लोक नवीन महागडा राउटर विकत घेण्याचा विचार करू लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की, या मंद(Slow) वाय-फाय स्पीडची आणि डेड झोन्सची समस्या सोडवण्याचे रहस्य तुमच्या लिव्हिंग रूममध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेले आहे. तुम्ही पोळ्या गुंडाळण्यासाठी किंवा अन्न गरम ठेवण्यासाठी वापरत असलेले ॲल्युमिनियम फॉइल तुमच्या घरातील इंटरनेटसाठी सिग्नल बूस्टर बनू शकते.


चला तर मग, ॲल्युमिनियम फॉइलचा(Aluminium Foil) वापर करून वाय-फायचा वेग आणि रेंज सुपरफास्ट करण्याच्या ४ सर्वात सोप्या आणि प्रभावी टिप्स जाणून घेऊया.



वाय-फायचा वेग कसा वाढवावा:
तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की तुम्ही महत्त्वाचे ऑनलाइन काम करत आहात, एखादा आवडता कार्यक्रम पाहत आहात किंवा वर्क-फ्रॉम-होम मीटिंगमध्ये आहात आणि अचानक तुमचा वाय-फाय सिग्नल जातो किंवा स्लो होतो? कधीकधी असे होते की वाय-फाय एका खोलीत सुरळीत चालते, पण तुम्ही दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच सिग्नल गायब होतो.


घराच्या विविध कोपऱ्यांतील मंद वाय-फाय सिग्नलची समस्या सोडवण्यासाठी महागडा नवीन राउटर विकत घेण्याची गरज नाही. स्वयंपाकघरातील ॲल्युमिनियम फॉइल आणि शीतपेयांचे(coldrinks) डबे उत्कृष्ट सिग्नल बूस्टर म्हणून काम करू शकतात. ॲल्युमिनियम फॉइलपासून पॅराबोलिक रिफ्लेक्टर तयार करून तो राउटरच्या अँटेनाच्या मागे ठेवल्यास सिग्नलची ताकद ५५% पर्यंत वाढू शकते.



ॲल्युमिनियम फॉइलचा एक तुकडा कापून, त्याला पॅराबोलिक (परवलयाकार) आकारात दुमडा आणि तुमच्या राउटरच्या अँटेनाच्या मागे ठेवा. हे एका डिशप्रमाणे काम करते, जे सिग्नलला पसरू न देता, त्याला थेट खोलीत निर्देशित करते. डार्टमाउथ कॉलेजमधील संशोधकांनी दाखवून दिले आहे की, यामुळे विशिष्ट भागांमध्ये सिग्नलची ताकद ५५% पर्यंत वाढू शकते.


एक रिकामा कार्डबोर्ड रोल घ्या, त्यावर ॲल्युमिनियम फॉइल लावा आणि तो तुमच्या राउटरच्या अँटेनावर ठेवा. ॲल्युमिनियम फॉइल रेडिओ लहरींना परावर्तित करून एकाच दिशेने केंद्रित करते.


स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे रिफ्लेक्टर्स घरातील वायरलेस कव्हरेज सुधारूण आणि अधिक मजबूत करू शकतात.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे