- EPF बॅलन्स तपासायचा आहे पण UAN नंबर आठवत नाही? जाणून घ्या सोपी ऑनलाइन पद्धत
भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा झाले आहेत की नाही किंवा खात्यातील शिल्लक (Balance) तपासायची असेल, तर १२ अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, अनेकदा नागरिक आपला UAN नंबर विसरतात आणि माहिती मिळवण्यासाठी बँक किंवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जावे लागते. परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही; तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत तुमचा UAN नंबर शोधू शकता.
तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक स्तरावरील 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Clean-Up) ...
UAN नंबर ऑनलाइन कसा शोधाल? या पद्धतीने शोधा UAN नंबर :
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये EPFO चे अधिकृत पोर्टल उघडा.
- UAN क्रमांक मिळवण्यासाठी EPFO पोर्टलच्या जुन्या व्हर्जनवर जा.
- तेथे कोपऱ्यात दिलेल्या 'KYC Update' या पर्यायावर क्लिक करा.
- 'सिक्युअर व्हेरिफिकेशन आणि क्विक प्रोसेस' अंतर्गत सुरक्षित पडताळणीची प्रक्रिया निवडा.
- स्क्रीनवर आपला नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
- यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सदस्य आयडी(Member ID) यांपैकी एक पर्याय ओळखपत्र म्हणून निवडा.
- कॅप्चा आणि OTP: स्क्रीनवरील कॅप्चा कोड टाकून 'Send OTP & Verify' वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून पडताळणी पूर्ण करा.
- OTP टाकून सबमिट करताच पुढील स्क्रीनवर तुमचा UAN नंबर दिसेल.
नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War) पाकिस्तानवर भारताने ऐतिहासिक विजय ...
मिस्ड कॉलवरून कसा मिळवता येईल UAN नंबर?
ऑनलाइन प्रक्रियेव्यतिरिक्त तुम्ही मिस्ड कॉल देऊनही UAN नंबर मिळवू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर EPFO कडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत नंबरवरून 01122901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास एसएमएसद्वारे (SMS) तुम्हाला तुमचा UAN नंबर प्राप्त होईल.