Sunday, July 26, 2026

Neeraj Grover Murder Case: मुंबईला हादरवणाऱ्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाची 'इनसाइड स्टोरी', संशयाचं भूत डोक्यात शिरलं आणि घेतला जीव; मृतदेहासमोर दोघांचे अश्लिल कृत्य

Neeraj Grover Murder Case: मुंबईला हादरवणाऱ्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाची 'इनसाइड स्टोरी', संशयाचं भूत डोक्यात शिरलं आणि घेतला जीव; मृतदेहासमोर दोघांचे अश्लिल कृत्य

प्रेम आणि संशयातून निर्माण झालेली रक्तरंजित घटना

मे 2008 मधील मुंबईत घडलेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. साऊथ चित्रपटात काम करणारी मारिया सुसाईराज बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली होती. इथे तिची भेट कास्टिंग डायरेक्टर नीरज ग्रोव्हरशी झाली. नीरजच्या मदतीने मारियाने मालाडमध्ये एक नवीन फ्लॅट घेतला होता. (Neeraj Grover)

दरम्यान मारियाचा होणारा नवरा आणि नेव्ही लेफ्टनंट एमिल जेरोम मैथ्यू कोचीमध्ये तैनात होता. एकेदिवशी मारियाने फोनवर जेरोमशी बोलताना नीरज आपल्याला पसंत करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जेरोमच्या मनात संशय निर्माण झाला होता. जेरोमने अनेकदा तीला नीरजपासून लांब राहण्याते सांगितले होते. (Neeraj Grover Murder Case)

6 मे 2008 च्या रात्री नीरज मारियाला नवीन फ्लॅटवर शिफ्ट होण्यासाठी मदत करायला गेला होता. रात्री उशिरा जेरोमने फोन केला असता त्याला नीरजचा आवाज ऐकू आला. यामुळे जेरोमला नीरजा भयंकर राग आला होता. याच रागाच्या भरात जेरोम कोचीहून विमानाने मुंबईत आला. तो कोचीहून मुंबईला आला असल्याची कोणालाच माहिती नव्हती.

7 मे 2008 च्या सकाळी जेरोमने मारियाच्या फ्लॅटवर धडक मारली. तिथे नीरजला पाहून जेरोमला भरपूर राग आला. रागाच्या भरात दोघांमध्ये शिवीगाळ सुरु झाली. रागाचा भडका इतका वाढला की, दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. रागाच्या भरात जेरोमने किचनमधील चाकूने नीरजच्या छातीवर वार केले, ज्यामुळे नीरजचा जागीच मृत्यू झाला.

नीरजचा मृतदेह दोघांच्या समोर निपचीत पडून होता.या घटनेनंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावायची यासाठी मास्टर प्लॅन तयार केला. पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मारियाने मॉलधून नवीन बॅगा, पडदे आणि चाकू खरेदी केले. दोघांनी नीरजच्या मृतदेहाचे तुकडे करून बॅगांमध्ये भरले. त्यानंतर मित्राच्या गाडीतून ते मनोर येथील जंगलात गेले आणि पेट्रोल ओतून मृतदेह जाळून टाकला.

नीरज बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला मारिया पोलिसांना चुकीची माहिती देत होती. मात्र, पोलिसांनी कडक चौकशी केल्यावर ती तुटली आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे चौकशीत मारिया आणि जेरोम यांनी मृतदेहांचे तुकडे केले आणि तिथेच दोघांनी शारिरीक संबंध ठेवले होते अशी माहिती समोर आली.

या प्रकरणात केवळ पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवत मारियाला 3 वर्षांची शिक्षा झाली आणि 2011 मध्ये ती तुरुंगातून बाहेर आली. त्यानंतर 2015 मध्ये आर्थिक फसवणुकीप्रकरणी तिला पुन्हा अटक करण्यात आली होती. ग्लॅमरस दुनियेत नाव कमावू पाहणारी मारिया आज अज्ञातवासात आयुष्य जगत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >