Sunday, July 26, 2026

Sankarshan Karhade : बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते! संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या खास भावना

Sankarshan Karhade : बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते! संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या खास भावना
मुंबई : 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या कौटुंबिक नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. संकर्षणने सोशल मीडियावर एक अत्यंत सुंदर आणि भावूक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्याच्या लेकाची—सर्वज्ञची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. नाटकात वडिलांची एन्ट्री होताच लेकाला(Son) आनंद गगनात मावेना: संकर्षण सध्या त्याच्या 'कुटुंब कीर्तन' या कौटुंबिक नाटकाचे प्रयोग करत आहे. हे नाटक पाहण्यासाठी त्याची पत्नी शलाका, मुलगी स्रग्वी आणि मुलगा सर्वज्ञ उपस्थित होते.
नाटकात संकर्षणची स्टेजवर एन्ट्री होताच, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सर्वज्ञला आनंद अनावर झाला. वडिलांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला अभिमान, कौतुक आणि आनंदाने वाजवलेल्या टाळ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. 'हे माझे बाबा आहेत!' हा भाव त्याच्या डोळ्यांत स्पष्टपणे जाणवत होता. बापासाठी यापेक्षा मोठी कमाई ती कोणती? हा व्हिडिओ शेअर करताना संकर्षणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, "सामान्यपणे मुलाला स्टेजवर पाहताना आई-वडिलांच्या डोळ्यांत जे कौतुक असतं, तेच कौतुक आज बापासाठी लेकाच्या डोळ्यांत दिसलं. मुलाच्या डोळ्यांत स्वतःबद्दलचे हे अथांग प्रेम आणि कौतुक पाहणे हा कोणत्याही बापासाठी आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असतो."
पुढे बोलताना संकर्षणने लिहिले की, "आज पोरगा बापाकडे कौतुकाने पाहतोय. उद्या वेळ बदलेल, हाच मुलगा मोठा होऊन स्वतःच्या पायावर उभा राहील आणि कर्तृत्व सिद्ध करेल, तेव्हा तोच बाप प्रेक्षकांत बसून मुलाकडे याच कौतुकाने आणि अभिमानाने पाहेल." बाप-लेकाच्या या गोड नात्याचा आणि भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >