Burglary at Sachin Ahir Residence : धक्कादायक! १८ हजार पगारावर असणाऱ्या नोकराने मारला अडीच कोटींचा डल्ला; एका टीपमुळे सचिन अहिर यांच्या घरातील चोरीचा पर्दाफाश

मुंबई : शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांच्या चोरीप्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेने मोठा उलगडा केला आहे. या प्रकरणात घरात काम करणाऱ्या आणखी तीन नोकरांना अटक करण्यात आली असून, अटक झालेल्या आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, केवळ १८ हजार रुपये मासिक पगार असलेल्या नोकरांच्या ऐषआरामी जीवनशैलीमुळे आणि एका माहितीदाराने दिलेल्या गुप्त टिपमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. (Burglary at Sachin Ahir Residence)



आणखी तीन आरोपी गजाआड :


गुन्हे शाखेने शनिवारी सतीशकुमार मिस्त्री (२६), अमित यादव (२६) आणि सूरज गौतम (२१) या तिघांना अटक केली. यापूर्वी शुक्रवारी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Burglary at Sachin Ahir Residence)



टप्प्याटप्प्याने लंपास केला कोट्यवधींचा ऐवज :


पोलिसांच्या तपासात आरोपींनी सचिन अहिर यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने, १०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, हिऱ्यांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू हळूहळू चोरल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून १५ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट आणि २९.७ लाख रुपये किमतीची सोन्याची लादी जप्त केली आहे. उर्वरित ऐवजाचा शोध सुरू असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. (Burglary at Sachin Ahir Residence)



१८ हजार पगार... पण गावी घेतली घर, जमीन आणि वाहने :


या प्रकरणाचा उलगडा एका माहितीदाराने दिलेल्या महत्त्वाच्या टिपमुळे झाला. मासिक अवघा १८ हजार रुपये पगार असलेल्या दोन आरोपींनी आपल्या मूळ गावी झारखंडमध्ये नवीन घर, लाखो रुपयांची जमीन आणि दोन वाहने खरेदी केल्याची माहिती मिळाली. इतकेच नव्हे तर त्यांनी नातेवाईकांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसेही जमा केल्याचे समोर आले. माहितीदाराने यासंदर्भातील छायाचित्रेही अहिर कुटुंबाला पाठवली. त्यानंतर संशय बळावला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. (Burglary at Sachin Ahir Residence)



आरोपींचा बचाव, पोलिसांचा तपास सुरू :


सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील उमेश कुमार आणि निराली शर्मा यांनी आरोपींकडून कोणताही चोरीचा ऐवज जप्त झालेला नसल्याचा दावा करत त्यांना विनाकारण अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद केला. मात्र, चोरीतील संपूर्ण माल जप्त करणे आणि कटाचा संपूर्ण तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत आरोपींना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Burglary at Sachin Ahir Residence)


या प्रकरणामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली असून, घरातील विश्वासू नोकरांनीच कोट्यवधींची चोरी केल्याने घरगुती सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य