- केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्याच्या सूचना; इन्स्टाग्रामवर संवादात्मक कंटेंटवर भर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय राहण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ सरकारी योजनांची माहिती पोस्ट करण्याऐवजी तरुणांशी थेट आणि संवादात्मक पद्धतीने जोडले जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
माध्यमांतील वृत्तांनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) उपस्थित मंत्र्यांना विचारले, "तुमच्यापैकी किती जण इन्स्टाग्रामचा नियमित वापर करतात?" यावेळी त्यांनी आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे सांगत, या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला.
'फक्त माहिती पोस्ट करू नका, संवाद साधा' :
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मंत्र्यांना केवळ सरकारी कामकाजाच्या पोस्ट शेअर करण्यापेक्षा लोकांशी संवाद वाढवणारा कंटेंट तयार करण्याचा सल्ला दिला. प्रश्नोत्तर, लघु व्हिडिओ, माहितीपूर्ण रील्स आणि जनतेशी थेट जोडणाऱ्या पोस्टद्वारे विशेषतः युवा वर्गापर्यंत पोहोचण्याचा आग्रह त्यांनी धरला.
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील ४७ ...
रील्स तयार करण्याचाही सल्ला :
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) मंत्र्यांना इन्स्टाग्राम रील्स आणि आकर्षक व्हिडिओ कंटेंट तयार करण्यासही प्रोत्साहन दिले. नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पारंपरिक संदेशांपेक्षा छोट्या आणि प्रभावी व्हिडिओंचा वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
स्वतःही मध्यरात्री पोस्ट केली रील :
विशेष म्हणजे, मंत्र्यांना हा सल्ला देण्याच्या काही तासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. "Friends" या परिचित संबोधनाने सुरू झालेल्या या व्हिडिओत त्यांनी अधिक अनौपचारिक आणि संवादात्मक शैली स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. यावरून सरकारच्या 'डिजिटल-फर्स्ट कम्युनिकेशन' धोरणाला अधिक गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे. (PM Narendra Modi)
भारताची ऐतिहासिक झेप ; हवाई सुरक्षा यंत्रणा होणार अधिक मजबूत नवी दिल्ली : भारत आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने अत्यंत ...
तरुणांशी सातत्याने संपर्क ठेवण्यावर भर :
सूत्रांच्या मते, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) मंत्र्यांना स्पष्ट सांगितले की, आजचा तरुण मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे सरकारच्या योजना, निर्णय आणि उपक्रम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा अधिक परिणामकारक वापर करणे आवश्यक आहे.
NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण :
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कथित NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. विशेषतः इन्स्टाग्राम रील्स, व्हायरल व्हिडिओ आणि लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून या आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) भर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
View this post on Instagram




