Saturday, July 25, 2026

Devendra Fadnavis : "तुका म्हणे उगे रहावे..."; म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांनी दिला पूर्णविराम

Devendra Fadnavis :

- दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप! 'जे मिळालंय तेच सर्वोत्तम', समाधानाचा मंत्र"

पंढरपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत जाणार असल्याच्या राजकीय चर्चांना स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पूर्णविराम दिला आहे. "जे दिलंय ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं," असे सांगत आपण सध्याच्या जबाबदारीत पूर्णपणे समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत महत्त्वाची भूमिका स्वीकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले, "जे मिळालं आहे तेच सर्वोत्तम आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 'तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी' हा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळे मी आजच्या जबाबदारीत पूर्णपणे समाधानी आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील संभाव्य नियुक्तीच्या चर्चांवर विराम लागल्याचे मानले जात आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही फडणवीसांनी उत्तर दिले. "पदावर किती वर्षे राहिलो यापेक्षा त्या काळात जनतेसाठी किती काम केले, हे अधिक महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "मी मुख्यमंत्रीपदावर (Devendra Fadnavis) सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. माझा क्रमांक तिसरा आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत जनतेची सेवा करत राहणार आहे. त्यांच्या कृपेने पुढेही अनेक चांगली कामे करण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे."

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही "मला महाराष्ट्रातच राहायचे आहे आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार," अशी प्रतिक्रिया देत दिल्लीच्या चर्चांवर भाष्य केले होते. आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनीही आपण सध्याच्या भूमिकेत समाधानी असल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना मोठा विराम मिळाला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >