Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम



मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल, असे दावे विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यावर भाष्य करताना, मी महाराष्ट्रात समाधानी आहे, असे फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.(Devendra Fadnavis)



दिल्लीत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावताना मुख्यमंत्र्यांनी ‘तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी’ या ओळींचा संदर्भ दिला. “माझे चित्त पूर्णपणे समाधानी आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला सहा वेळा आषाढी आणि दोन वेळा कार्तिकी एकादशीला पूजा करण्याचे भाग्य लाभले. राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही संधी मिळणे हा विठूरायाचाच प्रसाद आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्जमाफी किंवा हमीभाव पुरेसा नसून उत्पादन खर्च कमी करणे हाच खरा उपाय आहे. शेतमालाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवत असल्याने आणि उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. मोफत वीज, सूक्ष्म सिंचन, सौरपंप आणि कृषी यंत्रसामग्रीवर ९० ते १०० टक्के अनुदान दिले जात आहे. तसेच ‘महाविस्तार’ सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai) तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.(Pandharpur)




पंढरपूर कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार



- पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ८० ते ९० टक्के स्थानिक नागरिकांच्या शंका निरसन करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांशी संवाद साधून सर्वांना विश्वासात घेऊनच काम पुढे नेले जाईल. या प्रकल्पाचे महत्त्वाचे काम पुढील दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असून यामुळे विस्थापित होणाऱ्यांना योग्य पुनर्वसन करून प्रस्थापित केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
- दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, ठाकरे बंधूंकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाचा विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांशी काहीही संबंध नसून, आपल्या राजकीय पुनरागमनासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचे दिसते.
- दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने मागण्या मांडणाऱ्या आंदोलकांचा आणि अराजकता माजवू पाहणाऱ्या राजकीय घटकांचा वेगळा विचार केला पाहिजे. केंद्र सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्याने आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेत शांततेचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध