मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असल्याची चर्चा दिल्लीसह राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
View this post on Instagram
पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. हिंजवडीला शहराच्या ...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा दिल्लीतील वावर आणि केंद्रीय नेतृत्वाशी होणाऱ्या बैठकांमुळे विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळण्याबाबतचे विरोधी पक्षांकडून सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, या घडामोडींपूर्वी आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत भाष्य केले. (Devendra Fadnavis)
View this post on Instagram
दिल्लीत केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यास काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “जे मिळाले आहे त्यात मी पूर्ण समाधानी आहे. ‘तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी’ या उक्तीप्रमाणे माझे चित्त पूर्णपणे समाधानी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ठरलेला हा दिल्ली दौरा राजकीय पटलावर नव्या समीकरणांना जन्म देईल का, याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. (Devendra Fadnavis))





