पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत रोजगार हमी योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी रोजगार हमी विभागाकडून 'संवाद वारी' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाखरी येथे चित्ररथ, पथनाट्य आणि पोवाड्याच्या माध्यमातून योजनेची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी भेट देत कलाकार आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. (Ashadhi Wari)
PMFBY : महाराष्ट्रात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे ...
यावेळी मंत्री गोगावले यांनी पथनाट्याचा प्रयोग पाहिला, कलाकारांचा सत्कार केला आणि त्यांच्या जनजागृतीच्या कार्याचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी वारीतील वारकऱ्यांना स्वतः माहितीपत्रके वाटून रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली. (Bharat Gogawale)
माध्यमांशी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, विकसित भारत 2047 या संकल्पनेत ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी संवाद वारी अभियान सुरू करण्यात आले आहे. पुण्यापासून सुरू झालेला हा जनजागृतीचा प्रवास गेल्या 13 ते 14 दिवसांपासून विविध ठिकाणी सुरू असून आता तो पंढरपूर परिसरात पोहोचला आहे. (Padharpur)
Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस
- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद
मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा ...
मंत्री गोगावले यांनी सांगितले की, पूर्वीच्या रोजगार हमी योजनेचे रूपांतर आता व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत रोजगार हमी योजनेत करण्यात आले आहे. या योजनेत रोजगाराचे दिवस 100 वरून 125 करण्यात आले असून कामांची संख्या 266 वरून 318 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच मजुरीचा दर 317 रुपये करण्यात आला असून तो आणखी वाढविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
'काम केल्यानंतर लगेच दाम' हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे सांगत त्यांनी वेळेत मजुरी, शाश्वत रोजगार, वैयक्तिक लाभाच्या योजना आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगार भत्त्याचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच घरकुल योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ( Employment Guarantee Scheme)
या कार्यक्रमाला पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, उपजिल्हाधिकारी अंजली मरुड, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, अतुल राजुरकर तसेच रोजगार हमी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.