Thursday, August 13, 2026

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत (Pune Moshi) पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात 23 वर्षीय पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाली नागेश गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील राहत्या घरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या 8 जुलै रोजी मोशी कचरा डेपोतील इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळला होता. या दुर्घटनेत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सोनाली यांचे पती नागेश गायकवाड यांचाही समावेश होता. पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूचा धक्का सोनाली यांना सहन झाला नाही आणि त्यातून त्या नैराश्यात गेल्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. (Suicide Case)

मात्र, या प्रकरणात सोनाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. नागेश यांच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींकडून सोनाली यांना मानसिक त्रास दिला जात होता, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्याशी बोलणे टाळले जात होते तसेच नागेश यांच्या मृत्यूसाठीही त्यांनाच दोषी ठरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Moshi Building Collapse)

सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ अभय वक्ते आणि नातेवाईक दिनेश मधुकर वक्ते यांच्यासह माहेरची मंडळी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचली. सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. (Pimpri)

नातेवाईकांनी आणखी एक आरोप केला आहे. नागेश यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळालेल्या 10 लाख रुपयांच्या मदतीपैकी 60 टक्के रक्कम सासू-सासऱ्यांनी घेतली आणि उर्वरित 40 टक्के रक्कम सोनाली यांना देण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी होणे अपेक्षित आहे. (Pune Women Suicide)

सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन लहान मुलींच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. या प्रकरणाचा भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >