Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गारखेडा (Garkheda) येथे धक्कदायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाच्या डोक्यात काठीने प्राणघातक वार करू हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर मृतदेह ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकून अपघात झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न संशयिताने केला होता. रावेर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावत संशयिताला अटक केली आहे. (Jalgaon Crime News)
देहरादून: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाने ...
नेमकं प्रकरण काय ?
मयताचा सख्खा पुतण्या २९ वर्षीय अनिल जखा बारेला (Anil Jakha Barela) याचे काका रामा बारेला (Rama Barela) यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सतत वाद सुरु होते. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास हा वाद अधिकच उफाळून आला. रागाच्या भरात संशयिताने घराजवळच पडलेल्या लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार करत त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने रामा बारेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)
केंद्रीय निवडणूक आयोगाचे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबई : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ...
अपघाताचा बनाव रचला अन्...
हत्या केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून संशयित पुतण्याने काकाचा मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेला. त्यानंतर पायवाटे जवळील नाल्याच्या कडेला मृतदेह टाकून अपघाती मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील परिस्थितीसह जखमांचे स्वरूप पोलिसांना संशयास्पद वाटले त्यामुळे पोलिसांनी घटनेचा बारकाईने तपास केला. पोलिसांच्या तपासामुळे संशयिताचा डाव फसला. (Jalgaon Crime News)
Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या ...
पुतण्या ताब्यात, तपास सुरु
याप्रकरणात पोलिसांनी संशयित अनिल बारेला याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी त्याने जमिनीच्या वादातून काकाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलिसांकडून सुरू असून खुनामागील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. दरम्यान जमिनीच्या वादातून झालेल्या या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



