Wednesday, July 22, 2026

Nashik News : नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील पैसे वाटपाची चौकशी करा!

Nashik News : नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील पैसे वाटपाची चौकशी करा!

केंद्रीय निवडणूक आयोगाचे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मतदारांना झालेल्या कथित पैसे वाटपाच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आयोगाच्या या आदेशानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित तपास यंत्रणांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.

या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून आव्हान उभे केले होते. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यावरून ओझर विमानतळावर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांनी मध्यस्थी करत गोकुळ गीते यांची मनधरणी केली होती. नेत्यांच्या आवाहनानंतर गीते यांनी प्रचार थांबवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही अपक्ष गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव केला. या निकालानंतर आमदार किशोर दराडे यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप माध्यमांसमोर केला होता. (Nashik )

याच कथित आर्थिक व्यवहाराच्या आधारे तक्रारदार संजय काळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने नाशिक जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नेमके पैसे कोणाला आणि किती देण्यात आले, तसेच मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी कोणती यंत्रणा वापरली गेली, याची कसून चौकशी केली जाणार आहे. तक्रारदाराने दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.(Nashik )

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >