BMC News : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष

मुंबई : मुंबईतील (Mumbai) गरीब, गरजू रुग्णांना महापौरांच्या माध्यमातून आर्थिक निधीची मदत केली जात असून मागील प्रशासक काळामध्ये मंदावलेली ही प्रक्रिया आता जलदगतीने राबवली जाणार आहे. यासाठी महापौर वैद्यकीय सहायता कक्ष स्वतंत्रपण निर्माण केला जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून मुंबईतील गरीब आणि गरजू रुग्णांंचे अर्ज निकालात काढून त्यांना वैद्यकीय आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या धर्तीवर आता महापौर वैद्यकीय निधी कक्षाची स्थापना केली जात आहे.


गोरगरीब जनतेला स्वत:चे वैद्यकीय उपचार करता यावे यासाठी महापौर निधीतून ५ ते २५ हजर रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांकडून तथा त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननीनंतर महापौरांच्या मंजुरीनंतर निधी उपलब्ध करून दिला जातो.



प्रशासक काळ संपल्यांनतर सुमारे ८०० ते ९०० अर्ज प्रलंबित होते. त्यानंतर महापौरपदी रितू तावडे (Ritu Tawde) यांनी पदाचा भार स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी या सर्व जुन्या अर्जांची छाननी करून पात्र ठरलेले अर्ज निकालात काढले. त्यानुसार सध्या केवळ १२५ हून अधिक अर्ज आज महापौर निधीसाठी प्रलंबित आहे. मात्र,आता महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष निर्माण करून त्यानुसार जास्तीत जास्त अर्ज निकालात काढून रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी महापालिका सभागृहाच्या बाहेरील जागेत महापौरांच्या अभ्यागतांसाठी असलेल्या राखीव जागेत या महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या कक्षाची स्थापना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी २२ जुलै २०२६ रोजी होणार आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली जाणार आहे.



नगरसेवकांच्या खानपान सेवेची जागा जाणार


महापालिका सभागृहाच्या बाहेरील जागेत जुन्या स्थायी समितीच्या जागेचा काही वापर महापौरांच्या अभ्यागतांसाठी केला जात आहे. याच्या शेजारील मोकळ्या जागेत महापालिका सभागृहाच्या दिवशी खानपानाची सेवा पुरवली जाते. सभागृहाच्या दिवशी नगरसेवक या खानपान सेवेचा लाभ घेत असतात आणि अभ्यागतांसाठी असलेल्या जागेमध्ये बसून याचा आस्वाद घेत असतात. परंतु आता याच जागेत महापौर वैद्यकीय सहायक निधी कक्ष स्थापन केला जाणार असल्याने महापालिका सभेच्या दिवशी नगरसेवकांची मोठी गैरसोय होणार असून तात्पुरती उपहार गृहासाठी जागाच नसल्याने त्यांना आता खानपान सेवाअभावी मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष

Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च

Ghatkopar Landslide : धक्कादायक! घाटकोपर परिसरात गौशिया चाळीजवळ दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ३ ते ४ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच कुर्ला परिसरातून मोठी आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. घाटकोपर