EPFO 3.0 : नवी पेन्शन योजना येणार? गिग वर्कर्सपासून खासगी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या EPFO 3.0 सुधारणा कार्यक्रमांतर्गत एक नवी आणि अधिक लवचिक पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तावित योजना सध्याच्या Employees' Pension Scheme (EPS) पेक्षा अधिक व्यापक असू शकते. विशेष म्हणजे, ओला, उबर, स्विगी, झोमॅटो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे गिग वर्कर्स, तसेच सध्याच्या EPS च्या कक्षेबाहेर असलेले उच्च उत्पन्न गटातील कर्मचारीही या योजनेच्या कक्षेत येऊ शकतात. (EPFO 3.0)



रिटायरमेंटनंतर किती पेन्शन हवी, हे तुम्हीच ठरवणार!


प्रस्तावित योजनेतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Target Retirement Sum (TRS) संकल्पना. या प्रणालीमध्ये प्रत्येक सदस्याचे स्वतंत्र पेन्शन खाते असेल. निवृत्तीनंतर किती रक्कम किंवा पेन्शन हवी, हे सदस्य स्वतः ठरवू शकतील. यानंतर प्रणाली आपोआप गणना करून इच्छित उद्दिष्ट गाठण्यासाठी दरमहा किंवा दरवर्षी किती रक्कम जमा करावी लागेल, याची माहिती देईल. (EPFO 3.0)



रिअल-टाइम डॅशबोर्डवर मिळणार संपूर्ण माहिती :


माध्यमांतील वृत्तानुसार, प्रत्येक सदस्याला वैयक्तिक डिजिटल डॅशबोर्ड उपलब्ध करून दिला जाईल. या डॅशबोर्डवर जमा झालेली रक्कम, फंडाची सद्यस्थिती, गुंतवणुकीवरील परतावा आणि निवृत्तीच्या उद्दिष्टापर्यंत किती अंतर बाकी आहे, याची माहिती रिअल-टाइममध्ये पाहता येईल. गरजेनुसार सदस्यांना आपल्या निवृत्तीच्या उद्दिष्टात बदल करण्याची सुविधाही मिळू शकते. (EPFO 3.0)



फक्त कर्मचारी आणि कंपनीच नव्हे, सरकारही करणार योगदान?


सध्याच्या EPF योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता यांचेच योगदान असते. मात्र, प्रस्तावित योजनेत निधी अनेक स्रोतांतून जमा होऊ शकतो. यामध्ये - सरकारकडून कमी उत्पन्न गटासाठी सह-योगदान (Co-contribution), गिग वर्कर्ससाठी संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांचे योगदान, CSR निधी,
स्वयंसेवी संस्था (NGO), तसेच सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत अशा विविध पर्यायांचा विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. (EPFO 3.0)



अनेक नोकऱ्या, पण एकच UAN :


EPFO One-to-Many प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे एकाच Universal Account Number (UAN) अंतर्गत अनेक कंपन्या किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म जोडले जाऊ शकतील. याचा सर्वाधिक फायदा एकाचवेळी विविध ठिकाणी काम करणाऱ्या गिग वर्कर्सना होणार आहे. विविध नोकऱ्यांमधून जमा होणारा PF आणि पेन्शन निधी एका खात्यातून सहज ट्रॅक करता येईल. (EPFO 3.0)



NPS पेक्षा अधिक लवचिक योजना?


प्रस्तावित योजना National Pension System (NPS) पेक्षा अधिक लवचिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या NPS मध्ये निवृत्तीनंतर पैसे काढण्याबाबत काही निश्चित नियम आहेत. मात्र, नव्या योजनेत वयाच्या ५५ वर्षांपासूनच काही प्रमाणात निधी वापरण्याची मुभा देण्याचा विचार सुरू आहे. ५५ वर्षांपर्यंत खाते सामान्य PF प्रमाणे चालेल आणि त्यानंतर ते पेन्शन किंवा Systematic Withdrawal Plan (SWP) मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. (EPFO 3.0)



पेन्शन कशी घ्यायची, निर्णय तुमचाच :


या योजनेत सदस्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शनची रक्कम स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. जर केवळ व्याजावर आधारित पेन्शन घ्यायची असेल, तर मूळ रक्कम सुरक्षित राहील. अधिक पेन्शन हवी असल्यास मूळ निधीतूनही रक्कम काढण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. भविष्यात परिस्थितीनुसार पेन्शनची रक्कम बदलण्याची सुविधाही प्रस्तावित आहे. (EPFO 3.0)



कुटुंबालाही मिळणार संरक्षण :


प्रस्तावित योजनेत 'कौटुंबिक लाभ निधी' (Family Benefit Fund) स्थापन करण्याचाही विचार आहे. यामुळे सदस्याच्या मृत्यूनंतर त्यांचा जोडीदार, मुले किंवा अनाथ मुलांना पेन्शनचा लाभ मिळू शकतो. तसेच विद्यमान EPF किंवा GPF मधील निधी नव्या पेन्शन खात्यात हस्तांतरित करण्याचाही पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (EPFO 3.0)



सिंगापूरच्या मॉडेलचा अभ्यास :


EPFO या योजनेसाठी सिंगापूरसह इतर देशांतील निवृत्तीवेतन व्यवस्थेचा अभ्यास करत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश Code on Social Security प्रभावीपणे लागू करून गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना प्रथमच व्यापक सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे हा आहे. (EPFO 3.0)



अद्याप अंतिम निर्णय नाही :


ही योजना अद्याप चर्चेच्या टप्प्यात असून सरकार किंवा EPFO कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. योजनेची अंमलबजावणी कधी होणार, कोणती संस्था ती राबवणार आणि अंतिम नियम काय असतील, याबाबत निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या समोर आलेली माहिती ही प्रस्तावित सुधारणांशी संबंधित असून अंतिम धोरण जाहीर झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. (EPFO 3.0)

Comments
Add Comment

Navnath Ban : संजय राऊत देशातील तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत; त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – नवनाथ बन

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Uddhav Thackeray) नेते संजय राऊत

Mumbai MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा अखेर संपणार! मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीबाबत मोठे अपडेट

मुंबई : मुंबईत (Mumbai) स्वतःचे घर (Home) घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली

Maharashtra Politics : मी बोललो, तर तटकरेंचे पितळ उघडे पडेल!

- गृहराज्यमंत्री योगेश कदम; तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वाद चिघळला मुंबई : कोकणातील महायुतीत शिवसेना आणि

UBT Protest : उबाठा गटाच्या शिवाजी पार्कवरील आंदोलनप्रकरणात तीन गुन्हे दाखल

मुंबई : पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला (Protest) पाठिंबा देण्यासाठी उबाठा गटाच्या वतीने मुंबईतील

Nashik Accident News : मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, दोन दुचाकींना धडक; पती-पत्नीसह तीन जण गंभीर

Nashik Accident News : पावसाळयात रस्ते निसरडे होत असल्याने वाहनचालकांना अत्यंत सावधपणे वाहन चालवणे आवश्यक आहे. कारण या

Nashik : खाकीला डाग ! 10 हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार रंगेहात ताब्यात

Nashik : खाकीला काळीमा लावण्याचे काम नाशिकमधील दोन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात