नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील बहुप्रतिक्षित आणि आधुनिक काळातील सर्वात मोठ्या व्यापार करारांपैकी एक असलेला 'मुक्त व्यापार करार' बुधवारी अधिकृतपणे लागू झाला आहे. या ऐतिहासिक करारामुळे भारत आणि यूके यांच्यातील आर्थिक संबंधांत एक नवा अध्याय सुरू झाला असून, दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला मोठी गती मिळणार आहे.(India and the United Kingdom)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0 ला मंजुरी दिली असून, यासाठी एकूण 1.27 लाख कोटी रुपयांचे ...
सन २०२५ मध्ये भारत आणि यूके यांच्यातील एकूण व्यापाराचे मूल्य ४८ अब्ज पौंड इतके होते. आता हा करार लागू झाल्यामुळे या व्यापारात तत्काळ मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे ग्राहकांना आता सर्वोत्तम भारतीय आणि ब्रिटिश उत्पादने आणि सेवा अधिक स्वस्त, जलद आणि सुलभ उपलब्ध होणार आहेत. दीर्घकाळात, या करारामुळे द्विपक्षीय व्यापारात दरवर्षी २५.५ अब्ज पौंडांची भर पडेल, तर भारतीय जीडीपीमध्ये ५.१ अब्ज पौंड आणि यूकेच्या जीडीपीमध्ये ४.८ अब्ज पौंडांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कराराच्या अंमलबजावणीचा आनंद साजरा करण्यासाठी, मुंबईतील ब्रिटिश उपउच्चायुक्तालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्रिटिश एअरवेजच्या विमानाद्वारे यूकेमधून निवडक ब्रिटिश उत्पादनांचा एक संच भारतात आणण्यात आला. दक्षिण आशियातील व्यापार आयुक्त हरजिंदर कांग आणि ब्रिटिश एअरवेजचे भारताचे महाव्यवस्थापक डेव्हिड राइट यांनी या उत्पादनांचे अनावरण केले. यामध्ये सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ आणि मद्य यांचा समावेश आहे, ज्यावर आता आयात शुल्क कमी करण्यात आले आहे.
आराखडे, पुरवठादार आणि संवेदनशील कागदपत्रांसह १९ हजार फाईल्स उघड नवी दिल्ली : तमिळनाडू येथील कुडनकुलम भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाशी ...
यूकेमध्ये प्रवेश करणाऱ्या ९९ टक्के भारतीय वस्तूंवर आणि भारतात येणाऱ्या ९० टक्के ब्रिटिश वस्तूंवर आता कोणतीही आयात शुल्क नसेल किंवा ते मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे. तसेच ऑटोमोटिव्ह, उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), ग्राहक वस्तू, सर्जनशील उद्योग आणि वैद्यकीय तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांना या कराराचा थेट फायदा होणार आहे. ब्रिटिश एअरवेज सध्या दर आठवड्याला ६३ उड्डाणे चालवते, जी उन्हाळ्याच्या अखेरीस ७० पर्यंत वाढणार आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मोठी मदत होणार आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या स्वरूपात मोठे बदल निश्चित केले आहेत. एडिनबर्ग येथे ...
हरजिंदर कांग यांनी या कराराचे वर्णन 'वॉटरशेड मोमेंट' (Milestone) असे केले असून, हा करार व्यवसाय आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी डिझाइन करण्यात आला असल्याचे सांगितले. डेव्हिड राइट यांनीही भारत हा यूकेसाठी सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे अधोरेखित केले. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि लंडनमधील लँकेस्टर हाऊस येथे विविध व्यावसायिक स्वागत समारंभ आणि कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. भारत आणि यूके या दोन्ही देशांमधील हे नवीन आर्थिक नाते केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर एक नवीन 'आर्थिक कॉरिडोर' म्हणून उदयाला येईल, यात शंका नाही.






