पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय मुलीने आपला जीव संपवला. या घटनेमुळे संपूर्ण धनकवडीतील निर्मल पार्क सोसायटीत खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे ५:३० वाजता घडली.
Ashok Kharat : अशोक खरातचा पाय खोलात ! ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप अन् ...
Ashok Kharat: नाशिक काय तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव दाखवत ...
धनकवडी, निर्मल पार्क सोसायटीत राहणारी रिद्धी रवी केडिया (वय १७) हिने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप माहित पडलेले नाही. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. रिद्धी शनिवारवाडा येथील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिने नुकताच बारावी पास केली होती. (Pune Crime )
FIFA World Cup 2026 : मेस्सीला रोखण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार! माजी फुटबॉलपटूने सांगितली खास युक्ती
मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी येथे अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात खेळला जाईल. या सामन्याचे भारतात २० जुलै रोजी ...
नेमकं घडलं काय ?
बुधवारच्या रात्री नेहमीप्रमाणे संपूर्ण केडिया परिवार जेवण झाल्यानंतर झोपला. रिद्धी तिच्या आजीजवळ झोपायची. पहाटे आजीला जाग आली, तेव्हा आजीला रिद्धी दिसली नाही. आजीने घरातील लोकांना याची माहिती दिली. यानंतर घरातील सर्व जणांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रिद्धीचा घरात काहीही पत्ता लागला नाही. घराचा दरवाजा पाहिला असता तो आतून कडी कोयंडा लावून बंद होता. त्यामुळे घराच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहीले असता त्यांना तेथे एक स्टूल ठेवलेले दिसले. (Crime News)
NCP : राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल नाराज नाहीत!- हसन मुश्रीफ
विलिनिकरण करायचे असल्यास चर्चा दिल्लीतच होतील मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या आणि विलिनीकरण करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) ...
कुटुंबियांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली. काही वेळानंतर रिद्धीचा शोध लागला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला उपचार करण्यापूर्वीच मृत घोषित केले.पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आत्महत्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी तिचा मोबाइल, पुस्तके ताब्यात घेतली आहेत. पोलीस या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत.




