Nashik Crime News: नाशिकला कोणाची नजर लागली की काय असा प्रश्न शहरातील वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे निर्माण झाला आहे. नाशिकच्या पंकजनगर परिसरात कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून 4 जणांनी एकाच कुटुंबावर लाकडी दांडके तसेच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर हल्ल्यात एका महिलेसह दोघे जखमी झाले असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंकजनगर परिसरात सोसायटीतील काही लोक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत होते. याला विरोध केल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी विलास गायधनी यांच्यावर गंभीर हल्ला केला. फिर्यादी आणि त्यांचे भाऊ नामदेव गायधनी, मुले नितीन, चेतन आणि पुतण्या गोकुळ हे संशयित आरोपी विनायक भास्कर जाधव याला कचरा टाकू नका असे सांगण्यासाठी गेले होते. क्षुल्लक कारण होते, मात्र वाद टोकाला गेला. (Nashik Crime News)
माहितीनुसार, वाद झाल्यानंतर थोड्या वेळाने विनायक जाधव, त्याचे मुले शुभम जाधव, वैभव जाधव आणि अनंत शेळके हे लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेऊन आले आणि गायधनी कुटुंबीयांवर थेट हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीचा मुलगा नितीन गायधनी याच्या डोक्यात रॉडने वार करण्यात आला. तर फिर्यादी विलास गायधनी यांच्या डाव्या हातावर व चेहऱ्यावर देखील मार लागला आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पुतणी दिपाली नामदेव गायधनी हिला अनंत शेळके याने पोटात लाथ मारून खाली पाडले. यात ती देखील जखमी झाली. (Nashik Crime News)
दरम्यान, जखमींवर तातडीने बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड येथे उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी फिर्यादी विलास गायधनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक भास्कर जाधव, शुभम चंद्रकांत जाधव, वैभव चंद्रकांत जाधव आणि अनंत शेळके या 4 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Nashik Crime News: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या वाढणाऱ्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये आधीच भीतीचे वातावरण पसरले असताना इंदिरानगर परिसरात घडलेल्या एका ...
इंदिरानगर परिसरात तरुणीची निर्घृण हत्या
दरम्यान, दुसरीकडे इंदिरानगर परिसरात शुक्रवारी एका तरुण मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इंदिरानगर येथे रात्री १०. ३० च्या सुमारास हत्येचा थरार घडला असून येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती.






