BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण


अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश


मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) रुग्णालयांमधील रुग्णसेवेेबाबत वारंवार तक्रारी होत असल्याने आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी चक्क रुग्ण बनून रात्रीच्यावेळेला येथील रुग्णसेवेची माहिती जाणून घेतली. यावेळी खुद्द आरोग्य समिती अध्यक्षांनाच येथील अनागोंदी कारभाराचे दर्शन घडले असून चक्क रुग्णांच्या नातेवाईकांशी डॉक्टर (Doctor) आणि रुग्णालयीन कर्मचारी हे उध्दट वागत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे येथील या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांनी केली आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) रुग्णसेवेचा बोजवारा आणि प्रशासकीय अनागोंदी मध्यरात्री थेट समोर आली आहे. मुंबई महानगरपलिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे उपचारासाठी पाठवलेल्या एका रुग्णाला सकाळी ११:०० वाजता केईएम रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात आणले गेले होते. मात्र, तब्बल साडेनऊ ते दहा तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रात्री १०:३० वाजता त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आपत्कालीन रुग्णाबाबत होणारा हा अक्षम्य विलंब अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी हरिष भांदिर्गे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णालयाच्या दूरध्वनीवरून "आरोग्य समिती अध्यक्ष असोत की इतर लोकप्रतिनिधी, कोणाचेही फोन स्वीकारायचे नाहीत आणि कोणतेही रेफरन्स घ्यायचे नाहीत," असा धक्कादायक प्रतिसाद देण्यात आला. लोकप्रतिनिधींशी असे वर्तन अत्यंत अशोभनीय असून रुग्णहिताला बाधा आणणारे आहे, असा थेट आरोप भांदिर्गे यांनी केला.



या दूरध्वनीवरील प्रकारानंतर खुद्द अध्यक्षांनी स्वतः रात्री १२ वाजता रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. कॅज्युअल्टी विभागात रुग्णाची प्राथमिक तपासणी होण्यासाठीच दोन-दोन तास लागत होते. तपासणी कक्षात असणे अपेक्षित असलेले डॉक्टर जागेवर नव्हते. तर ऑन-कॉल सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (AMO) यांना बोलावूनही ते बराच वेळ हजर झाले नाहीत. वॉर्डमधील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी "आम्ही वैयक्तिक मोबाईलवरील फोन घेत नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा फोन आम्ही घेत नाही" अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर माहिती देणे आणि सुसंवाद राखणे ही रुग्णालय प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे अध्यक्षांनी यावेळी सुनावले.


या पाहणी दरम्यान केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्याशी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी चर्चा झाली असता, त्यांनी रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध डॉक्टरांवरील प्रचंड ताणाचा पाढा वाचला. त्यावर बोलताना हरिष भांदिर्गे यांनी स्पष्ट केले की, रुग्णांची संख्या वाढणे हे वास्तव असले तरी त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी कमी होत नाही. उलट अशा परिस्थितीत अधिक सक्षम नियोजन, पुरेसे मनुष्यबळ, प्रभावी व्यवस्थापन आणि उत्तरदायी नेतृत्व असणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवा बाधित होता कामा नये.



सर्वसामान्य नागरिकांचा महापालिका रुग्णालयांवर विश्वास असून वेळेत व सन्मानपूर्वक उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असे सांगत हरिष भांदिर्गे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच आपत्कालीन विभागाच्या कार्यपद्धतीचे तातडीने पुनर्मूल्यांकन करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.आणि रुग्ण मार्गदर्शन, संवाद व्यवस्था व प्रशासकीय उत्तरदायित्व अधिक सक्षम करावे, असे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेची रुग्णालये ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर, सन्मानाने आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची मूलभूत बांधिलकी आहे; यात कोणतीही कसूर सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची