Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. यंदा सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थी आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची आधीच्या दोन - तीन दिवसांत गावी पोहोचण्यासाठी प्रचंड घाईगडबड असणार. तसेच दीड दिवसाचे गणपती, पाच दिवसांचे गणपती, गौरी - गणपती, दहा दिवसांचे गणपती अशा घरोघरी वेगवेगळ्या स्वरुपात असलेल्या उत्सवाच्या दृष्टीने वेगवेगळ्या दिवशी गावी जाणाऱ्यांचीही मोठी संख्या असेल. यादृष्टीने पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या 09013, 09019, 09030, 09022, 09114, 09110, 09124 या गाड्यांसाठी ९ ऑगस्टपासून आरक्षण सुरू होणार आहे. पीआरएस काउंटर आणि IRCTC वेबसाईट येथे आरक्षण करता येईल. या गाड्या विशेष दरात विशेष गाड्या म्हणून धावतील. गाड्यांच्या वेळा, थांबे आणि रचनेबद्दल सविस्तर माहितीसाठी, प्रवाशांनी enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.



  1. 09013/09014 मुंबई सेंट्रल–ठोकुर–मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल (दोन फेऱ्या) : ०९०१३ मुंबई सेंट्रल–ठोकुर स्पेशल मंगळवार १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता सुटेल आणि बुधवार १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८.५० वाजता ठोकुर येथे पोहोचेल. तसेच ०९०१४ ही गाडी बुधवार १६ सप्टेंबर रोजी ठोकुर येथून सकाळी ११ वाजता सुटेल आणि गुरुवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.४० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, मुकाम्बिका रोड बैंदूर, कुंडापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये एसी थ्री टिअर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  2. 09019/09020 मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल स्पेशल (आठवड्यातून ४ वेळा, एकूण १६ फेऱ्या) : ०९०१९ मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड स्पेशल दर बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी मुंबई सेंट्रल येथून सकाळी १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०२.३० वाजेपर्यंत सावंतवाडी रोड येथे पोहोचणार. ही विशेष गाडी ११ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवली जाईल. तसेच ०९०२० सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार, शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी सावंतवाडी रोड येथून पहाटे ०४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ०८.१० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचले. ही ट्रेन १२ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवली जाईल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि जराप येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये एसी थ्री टिअर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  3. 09035/09036 वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी–वांद्रे टर्मिनस साप्ताहिक अनारक्षित स्पेशल (४ फेऱ्या) : ०९०३५ वांद्रे टर्मिनस - रत्नागिरी अनारक्षित स्पेशल दर गुरुवारी वांद्रे टर्मिनस येथून दुपारी ०२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.३० वाजता रत्नागिरीत पोहोचेल. ही गाडी १७ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी चालवली जाईल. तसेच ०९०३६ रत्नागिरी - वांद्रे टर्मिनस अनारक्षित स्पेशल दर शुक्रवारी रत्नागिरीतून मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी १८ आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी चालवली जाईल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  4. 09030/09029 वलसाड–रत्नागिरी–वलसाड साप्ताहिक स्पेशल (२ फेऱ्या) : ०९०३० वलसाड–रत्नागिरी स्पेशल सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी वलसाड येथून दुपारी ०२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०२.३० वाजता रत्नागिरीत पोहोचेल. तसेच ०९०२९ ही रत्नागिरी-वलसाड स्पेशल मंगळवार १५ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरीतून मध्यरात्री ०३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ०४.१५ वाजता पोहोचेल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये एसी थ्री टिअर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  5. 09022/09021 उधना–रत्नागिरी–उधना साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) : ०९०२२ उधना–रत्नागिरी स्पेशल दर गुरुवारी उधना येथून सकाळी ०८:०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही गाडी १७ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ०९०२१ रत्नागिरी–उधना स्पेशल दर गुरुवारी रत्नागिरी येथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:२० वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी १७ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी धावेल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये एसी थ्री टिअर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  6. 09114/09113 वडोदरा–रत्नागिरी–वडोदरा साप्ताहिक स्पेशल (२ फेऱ्या) : ०९११४ वडोदरा–रत्नागिरी स्पेशल मंगळवार, १५ सितंबर, २०२६ रोजी वडोदरा येथून सकाळी 11:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या मध्यरात्री ००.३० वाजता रत्नागिरीत पोहोचेल. तसेच ०९११३ रत्नागिरी–वडोदरा स्पेशल बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथून मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ०५.३० वाजता वडोदरा येथे पोहोचेल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर भरूच, सूरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळून, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, एसी टू टिअर, एसी थ्री टिअर, एसी थ्री टिअर इकॉनॉमी, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  7. 09110/09109 विश्वामित्री–रत्नागिरी–विश्वामित्री द्वि-साप्ताहिक स्पेशल (८ फेऱ्या) : ०९११० विश्वामित्री–रत्नागिरी स्पेशल दर बुधवार आणि शनिवारी विश्वामित्री येथून सकाळी 10:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.३० वाजता रत्नागिरीत पोहोचेल. ही ट्रेन १२ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवली जाईल. तसेच ०९१०९ रत्नागिरी–विश्वामित्री स्पेशल दर गुरुवारी आणि रविवारी रत्नागिरी येथून मध्यरात्री 01:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ०५.३० वाजता विश्वामित्री येथे पोहोचणार आहे. ही गाडी १३ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालवली जाईल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर भरूच, सूरत, वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये एस थ्री टिअर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

  8. 09124/09123 विश्वामित्री–रत्नागिरी–विश्वामित्री साप्ताहिक स्पेशल (४ फेऱ्या) : ०९१२४ विश्वामित्री–रत्नागिरी स्पेशल दर सोमवारी विश्वामित्री येथून पहाटे 05:55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजता रत्नागिरीत पोहोचेल. ही ट्रेन १४ आणि २१ सप्टेंबर २०२६ रोजी चालवली जाईल. तसेच ०९१२३ रत्नागिरी–विश्वामित्री स्पेशल दर सोमवारी रत्नागिरी येथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45 वाजता विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन पण १४ आणि २१ सप्टेंबर २०२६ रोजी चालवली जाईल. या गाड्या दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर भरूच, सूरत, वलसाड, वापी, डहाणू रोड, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहे. या गाडयांमध्ये एसी थ्री टिअर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)