Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन


वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक मनुष्यबळ असणार कार्यरत


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून महिलांच्या आरोग्य हितासाठी विशेष प्रयत्न सातत्याने करण्यात येतात. याच दृष्टिने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत करण्यात आले आहे. ही तपासणी विनामूल्य असणार आहे. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्ताने या लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.


या व्यापक मोहिमेच्या निमित्ताने मुंबईतील सर्व महिला वर्गाने, गृहिणी तसेच कार्यालयीन कामकाज करणाऱ्या महिला (Working Women) यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mumbai Myor Ritu Tawde), उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, शिवसेना गटनेते अमेय घोले, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे.


भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे इतर कर्करोगांच्या तुलनेत एक चतुर्थांश पेक्षा अधिक आहे. त्यामुळे स्तन कर्करोगाचे (Breast Cancer) लवकर निदान व्हावे, या दृष्टीने व्यापक तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन करण्यासाठी सभागृह नेते श्री. गणेश खणकर आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक महानगरपालिका मुख्यालयात पार पडली होती. प्रत्येक प्रभागातील महिलांना स्तनाच्या कर्करोग तपासणी मोहिमेत सहभागी होता यावे, याअनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष खणकर आणि भांदिर्गे यांनी सदर बैठकीदरम्यान दिले होते. यानुसार येत्या बुधवारी, अर्थात २२ जुलै २०२६ रोजी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.



आपल्या कुटुंबातील ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या प्रत्येक महिलेने या आरोग्य तपासणी अभियानामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. या अभियानाच्या अनुषंगाने आपल्या घरातील आई, बहिण, मुलगी यांनी स्तन कर्करोगाची तपासणी करून घ्यावी; ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तसेच महिलांनी संकोच न बागळता या तपासणी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले आहे.


मुंबईतील सर्व महिला वर्ग विशेषतः कार्यालयीन कामकाज करणाऱया (वर्किंग वुमन्स) महिला तसेच गृहिणी यांनी आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ देऊन या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमहापौर संजय घाडी यांनी केले आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच खासगी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालक यांनी आपल्या घरोघरी या आरोग्य तपासणी अभियानाच्या अनुषंगाने व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केले आहे.


कर्करोग तपासणी अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागामध्ये २ डॉक्टर, २ परिचारिका, २ आरोग्यसेविका यांचा चमू कार्यरत असणार आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये या चमूमार्फत महिलांच्या स्तनाच्या कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली आहे.


महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.



या अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला तपासणी करण्यासाठी केवळ ५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या तपासणी शिबिरामध्ये ३० वर्षांहून अधिक वयोमान असणाऱ्या महिलांची प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे. तसेच महिलांचा रक्तदाब आणि शारीरिक वजन यासारख्या गोष्टीही पडताळण्यात येणार आहेत. स्तनाच्या तपासणीनंतर ज्या महिलांना आवश्यकता आहे अशा महिलांना महानगरपालिकेच्या रूग्णालयात 'मॅमोग्राफी' या अद्ययावत चाचणीसाठी संदर्भित करण्यात येईल. महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (शीव) आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय येथे स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्याची मॅमोग्राफी चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.


प्रत्येक प्रशासकीय विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी या शिबिरासाठी समन्वय साधणार आहेत. महानगरपालिकेच्या प्रमुख चार आणि उपनगरीय रूग्णालयातून डॉक्टरांचा चमू प्रत्येक प्रभागामध्ये सहभागी होणार आहे. खासगी रूग्णालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, टाटा स्मारक केंद्र अशा विविध संस्थांच्या माध्यमातून देखील या तपासणी शिबिरासाठी डॉक्टर सहभागी होणार आहेत. या डॉक्टरांना महिलांच्या स्तनाच्या कर्करोग तपासणी शिबिराच्या अनुषंगाने 'टाटा स्मारक केंद्र' यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. या तपासणी शिबिरामध्ये २ हजारांहून अधिक इतक्या संख्येने वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ कार्यरत असणार आहे.


महानगरपालिकेच्या शाळा, अंगणवाडी तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून या अभियानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य सेविकांच्या माध्यमातून महिलांना आवाहन करण्यासाठी घरोघरी जनजागृती करण्यात येणार आहे.


गरोदर महिलांनी स्तनाच्या कर्करोग तपासणी नजीकच्या प्रसूतिगृह किंवा रूग्णालयाच्या ठिकाणी करावी, असे आवाहन यानिमित्ताने महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची