Nashik - दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Waterfal) तुम्ही फिरायला जात असाल तर थांबा कारण दुगारवाडी धबधब्याविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती असलेला दुगारवाडी येथील धबधबा हा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्याबाबतचा आदेश हा काढण्यात आला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुगारवाडीचा धबधबा हा आता अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.
राज्य सरकारचा निर्णय; नक्षली चळवळ कमकुवत झाल्याचे द्योतक, नागरिकांची पायपीट थांबणार मुंबई : नक्षली कारवायांमुळे वर्षानुवर्षे उपेक्षित आणि ...
पावसाळा चालू झाला की फिरस्तीची संख्या वाढते. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. नाशिकमध्येही पावसाने हजेरी लावल्याने डोंगर , धबधब्यांवर आकर्षक दृश्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे हे बघण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसत आहे. दरम्यान अशावेळेस काळजी न घेतल्यास दुर्घटना होण्याच्याही घटना घडतात. अशीच एक दुर्घटना नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवरील (Nashik - Trimbakeshwar Road) दुगारवाडी येथील धबधब्यावर घडली आहे.
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या ...
दुगारवाडी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू
दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfal) येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिक येथील २० वर्षीय युवकाचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत युवकाचे नाव अभिजीत नवनाथ पवार (वय २०, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे आहे. अभिजीत हा त्याचा मित्र प्रणव अविनाश खरे याच्यासोबत दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आला होता. माहितीनुसार दोघेही पाण्यात खेळत असताना अभिजीत याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता वरील घटना घडली उपस्थितांनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण असूनही फिरवली पाठ https://prahaar.in/2026/07/17/nashik-municipal-corporation-conducts-public-awareness-campaign-for-the-prevention-of-dengue-chikungunya-and-malaria/ मुंबई : "उद्धव ठाकरे यांचे ...
दुगारवाडी धबधबा अनिश्चित काळासाठी बंद
वनविभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी नागरिकांना पर्यटन स्थळावरती जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पण तरी देखील नागरिकांकडून फारशी काळजी घेतली जात नसल्याने तसेच या दुर्घटनंतर वनविभागाने अतिशय कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला असून त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी शुक्रवारी सकाळी एक आदेश प्रकाशित केला असून जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत दुगारवाडी येथील धबधब्यावरती जाण्यासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे.
नागरिकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी देवकर यांच्या या निर्णयामुळे आता दुगारवाडीचा धबधबा पुढील आदेशापर्यंत अनिश्चित काळापर्यंत हा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान देखील वनविभागाच्या वतीने देवकर यांनी केले आहे.





