Friday, July 17, 2026

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावरील उमाळा घाटात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण मोटार अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झालेत. (Jalgaon Accident News)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावकडे येणारी मोटार छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway भरधाव वेगाने प्रवास करत होती. दरम्यान, महामार्गावरील उमाळा घाट उतरताना रस्त्याच्या कडेला अथवा मार्गावर मालवाहू मोटार उभी असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.अपघात होईल या भीतीने चालकाने तात्काळ ब्रेक लावले मात्र वाहनाचा वेग अधिक असल्याने मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की, मोटारीचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झालाय. (Jalgaon Accident News)

जखमींवर उपचार सुरु

भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर अन्य चार जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. औद्योगिक वसाहत पोलिसांचे पथक, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Jalgaon Accident News)

गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >