Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Nashik Agricultural Produce Market Committee) लिलावात कोथिंबिरीच्या (Coriander) एका जुडीला तब्बल २८५ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील कोथिंबीर आता महागडी ठरू लागली आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३५६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ११३.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९४.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.( Nashik News )
नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जिल्हा ...
कोथिंबिरीच्या जुडीला २८५ रुपयांचा उच्चांकी दर
मात्र, पावसाचे असमान वितरण आणि काही भागातील पावसाच्या ओढीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आणि दरात मोठी वाढ झाली. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चार दिवसांपासून १४ जुलै रोजी कोथिंबिरीच्या जुडीला २०० रुपये, १५ जुलै रोजी २४८ रुपये, तर १७ जुलै रोजी २८५ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सर्वसाधारणपणे कोथिंबिरीची विक्री ७० ते २८५ रुपये प्रति जुडी या दराने झाली. बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कोथिंबिरीला मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. दरवाढीमुळे ग्राहकांना कोथिंबीर खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असून, सर्वसामान्यांच्या जेवणाच्या ताटातून कोथिंबीर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. ( Nashik News )
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या ...
दुगारवाडी धबधबा अनिश्चित काळासाठी बंद
दरम्यान , दुसरीकडे दुगारवाडी धबधब्याविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती असलेला दुगारवाडी येथील धबधबा (Dugarwadi Waterfal) हा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्याबाबतचा आदेश हा काढण्यात आला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुगारवाडीचा धबधबा हा आता अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.
दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfal) येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिक येथील २० वर्षीय अभिजीत नवनाथ पवार याचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. वनविभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी नागरिकांना पर्यटन स्थळावरती जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पण तरी देखील नागरिकांकडून फारशी काळजी घेतली जात नसल्याने तसेच या दुर्घटनंतर वनविभागाने अतिशय कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला असून त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी शुक्रवारी सकाळी एक आदेश प्रकाशित केला असून जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत दुगारवाडी येथील धबधब्यावरती जाण्यासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे.






