Friday, July 17, 2026

Jalgaon Crime : जळगावमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत...

Jalgaon Crime : जळगावमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत...

Jalgaon Crime : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा नव्या घटनेची भर पडली आहे. जळगावच्या जामनेर (Jamner) तालुक्यातील एका ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

विवाहितेवर सामूहिक बलात्कार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावच्या जामनेरमध्ये (Jamner) विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. महिला रस्त्याने पायी चालत जात होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिला जबरदस्ती आपल्या कारमध्ये बसवून जवळच्या ओढ्याजवळ नेले. त्याठिकाणी ६ जणांनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. घटनेचा व्हिडीओ तयार करून आरोपींनी तिला धमकी दिली. यावेळी आरोपींनी पीडित महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची देखील धमकी दिली. (Jalgaon Crime News)

व्हिडिओही व्हायरल करण्याची धमकी

या प्रकरणी फत्तेपूर पोलिस ठाण्यात (Fattepur Police Station) ६ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, अपहरण, दुखापत, धमकी तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला भीती दाखवून अत्याचार केल्याचा आरोप देखील पीडित महिलेने तक्रारीत नमूद आहे. अत्याचाराचा व्हिडिओही व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभरापासून आरोपींनी वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. (Jalgaon Crime News)

फत्तेपूर पोलिसांकडून तपास सुरु

अखेरीस, पीडितेनं हिंमत दाखवत फत्तेपूर पोलीस स्टेशन (Fattepur Police Station) गाठलं आणि तक्रार दाखल केली. या या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार (Gang Rape) , अपहरण, दुखापत, धमकी तसंच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी दिली. (Jalgaon Crime News)  संतापजनक आणि धक्कादायक म्हणजे, मागील 20 दिवसातील जामनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचाराची दुसरी घटना असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक ठरत आहे.

दरम्यान, दुसरीकडे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल (Yaval) तालुक्यातील किनगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून सासू आणि पतीने आपल्याच अंध पत्नीसह साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिले. या क्रूर कृत्यात साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकाचा जागीच बुडून मृत्यू झाला आहे, तर त्याची अंध माता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >