Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा


मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून (Chipi Airport) नवी मुंबईपर्यंत विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) असा तब्बल १० ते १२ तासांचा खडतर प्रवास आता अवघ्या १ तासावर येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला अधिक वेग येणार आहे.


गेल्या काही महिन्यांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गावी ये-जा करण्यासाठी प्रवाशांना संपूर्णपणे रस्ते किंवा रेल्वे मार्गावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबई विमानतळावरून चिपीसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Nitesh Rane)



पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, "१५ ऑगस्टपूर्वी 'फ्लाय ९१' ही विमान कंपनी चिपी ते नवी मुंबई या मार्गावर आपली सेवा सुरू करणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशातील आघाडीची 'इंडिगो' विमान कंपनीची सेवाही या मार्गावर प्रवाशांसाठी उपलब्ध होईल". सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी शनिवार व रविवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी विमानसेवा सुरू आहे. (Nitesh Rane)



पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला मिळणार गती :


नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांसह कोकणात येणारे व्यावसायिक, मोठे गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. आता विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना सिंधुदुर्गात पोहोचणे अधिक सोपे व सोयीस्कर होणार असून, यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणालाही मोठी चालना मिळणार आहे. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा