CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि पुराव्यांवर आधारित नियामक चौकट तयार करण्याची आग्रही मागणी 'कट्स इंटरनॅशनल'च्या (CUTS International) ताज्या अहवालात करण्यात आली आहे. 'हार्मनायझिंग बाईक टॅक्सी रेग्युलेशन्स: एव्हिडन्स-बेस्ड असेसमेंट अँड सजेस्टेड पाथवेज फॉर रिफॉर्म' या नावाने प्रसिद्ध झालेला हा अहवाल आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते (आर्थिक विषय) गोपाल कृष्ण अग्रवाल यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रकाशित करण्यात आला.



बाईक टॅक्सी या फर्स्ट आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मेट्रो आणि बस स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा सर्वात सोयीस्कर पर्याय ठरत आहे. ऑटो-रिक्षा (१५-१८ रुपये प्रति किमी) आणि टॅक्सीच्या (२२-२५ रुपये प्रति किमी) तुलनेत बाईक टॅक्सीचे भाडे अत्यंत कमी (८-१० रुपये प्रति किमी) असल्याने विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी हा पर्याय स्वस्त पडतो. कमी गुंतवणुकीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा व्यवसाय आहे. चालकांना सर्व खर्च वजा जाता दरमहा सरासरी २५ ते ३० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळू शकते. दिल्ली, महाराष्ट्र, केरळसह अनेक राज्यांत नियम वेगवेगळे आहेत. यामुळे कामगारांच्या उपजीविकेवर गदा येत असून कायदेशीर अनिश्चितता निर्माण झाली आहे. केवळ बंदी घालण्यापेक्षा औपचारिक नियमन करणे अधिक परिणामकारक असल्याचे अहवालात नमूद आहे.



केवळ दंड किंवा बंदी नको, तर आरोग्य व अपघात विमा, हेल्मेट सक्ती, पारदर्शक भाडेदर आणि तक्रार निवारण यंत्रणा यांसारख्या एकसमान सुरक्षा मानकांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे उद्दिष्ट योग्य असले, तरी सध्याच्या पेट्रोल वाहनांवर तातडीने बंदी न घालता 'प्रोत्साहनाधारित' टप्प्याटप्प्याने संक्रमण करावे.

Comments
Add Comment

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”: