- ऑनलाइन परीक्षा पद्धती ऑगस्ट २०२७ पासून; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत (MPSC Exam) विविध विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाकडून प्रस्तावित असलेली संगणकआधारित परीक्षा (ऑनलाइन) पद्धती लगेच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी दिले. तोपर्यंत विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये म्हणून विद्यमान प्रचलित लेखी पद्धतीनेच परीक्षा सुरू ठेवाव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि ...
या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एक सुरक्षित आणि पारदर्शी निवड प्रक्रिया राबवणे हा आमचा कायमच आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पूर्णपणे पारदर्शीच असली पाहिजे. सर्व परीक्षा विहित वेळेत पूर्ण होऊन त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही परीक्षा पद्धतीत सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे होणारे मार्गोत्क्रमण तितकेच सुरळीत आणि लवचिक असायला हवे. या नवीन बदलांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मानसिक आणि तांत्रिक तयारीसाठी तसेच संबंधित परीक्षा यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे", असे त्यांनी त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती ...
निर्णय काय झाला?
मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, प्रशासकीय सुधारणा टप्प्या-टप्प्याने राबवणे अधिक सोयीचे ठरते. त्यामुळे संगणकआधारित परीक्षेची प्रक्रिया तातडीने लागू न करता ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना आपली तांत्रिक सज्जता वाढवता येईल. या कालावधीत सध्या सुरू असलेल्या प्रचलित पद्धतीनेच परीक्षांचे आयोजन करण्यात यावे आणि त्या अनुषंगाने आता एमपीएससीने पुढील आवश्यक निर्णय व कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि प्रशासकीय तत्परतेची विशेष प्रशंसाही केली.






