Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) :हिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्यात आल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, याच्या निषेधार्थ तुळापूर (Tulapur) आणि निंभेरे (Nimbhere) या दोन गावांनी कडकडीत बंद पाळण्यात आला. (Ahilyanagar Crime News)



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी बुधवारी संध्याकाळी आपल्या कामावरून जात असताना, आरोपी आरमान जब्बार शेख (Armaan Jabbar Sheikh) याने तिला रस्त्यात अडवले आणि तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली होती. तिने तातडीने घरी जाऊन पालकांना हा सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. (Ahilyanagar Crime News)



संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांसमोर ठिय्या


संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी जमावाला शांत करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी आरमान जब्बार शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास चक्रावून फिरवत आरोपी आरमान शेख याला ताब्यात घेतले आहे. (Ahilyanagar Crime News)



दोन गावे कडकडीत बंद


या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी सकाळी तुळापूर आणि निंभेरे गावातील ग्रामस्थांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यावेळी आयोजित निषेध सभेत नागरिकांनी महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याची भावना व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी या निमित्ताने जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याने ग्रामस्थांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे. घटनेची माहिती सरपंच गणेश हारदेव, माजी सभापती भीमराज हारदे यांनी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांना व राहुरी मतदार संघाचे आ.अक्षय कर्डिले, आ.प्राजक्त तनपुरे यांना दिली व त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत