Ahilyanagar : अखेर 'तो' पोलीस अंमलदार निलंबित, एसपी सुदर्शन यांची कठोर कारवाई

Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना नागरिकांसाठी डोकेदुखीच्या ठरत आहेत. नागरिकांकडून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून एका सराईत गुन्हेगारासोबत संबंध असल्याच्या कारणावरून एका पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. शंकर चौधरी असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.




नेमकं प्रकरण काय ?


पोलीस अमंलदार शंकर चौधरी (Shankar Chaudhary) हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नेमणूक श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात (Office of the Additional Superintendent of Police) होती. मात्र, गुटखा तस्करीशी संबंधित कथित हप्तेखोरीच्या आरोपांनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्याची बदली पोलीस मुख्यालयात केली होती. त्यानंतरही त्याच्या विरोधातील तक्रारी मात्र कायम होत्या.




पोलिसांकडूनच अवैध धंद्यांना संरक्षण ?


श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या खुनानंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. दरोडे, खून, वाळू तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांशी काही पोलीस कर्मचार्‍यांचे संबंध असून त्यांच्या अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आणि या आरोपांमध्ये पोलीस अंमलदार चौधरी याचे नावही पुढे आले होते.




निलंबिताचे गुन्हेगारांसोबत फोटो


महत्त्वाचे म्हणजे शंकर चौधरी याचे खून, वाळू तस्करी, दरोडा अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारासोबतचे काही फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर या फोटोंबाबत पोलीस वरिष्ठांकडे अनेक तक्रारी गेल्या होत्या. वैजापूर पोलीस ठाणे (Vaijapur Police Station) हद्दीत वाळू तस्करांनी शेतकर्‍याला मारहाण केली त्यावेळी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये देखील गुन्हेगारांकडून चौधरीचे नाव घेतले गेले होते. त्यामुळे हा विषय गंभीर बनत चालला होता.


यामुळे थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याच्या आरोपांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी चौधरी याच्यावर निलंबनाची कारवाई करून अशा प्रकारांना सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे. या कारवाईमुळे शहरात दिलासा मानला जात आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे