Shehnaaz Gill : 'वो मेरा बहोत अच्छा दोस्त है...'; राघव जुयालसोबतच्या नात्याच्या चर्चांवर शहनाज गिलची प्रतिक्रिया

अभिनेत्री शहनाज गिल आणि अभिनेता-डान्सर राघव जुयाल यांच्या नात्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. २०२३ मध्ये 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघे ही एकत्र असल्याची चर्चांना सुरुवात झाली होती. अलीकडेच राघवच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना पुन्हा उधाण आले. ( Shehnaaz Gill)


या पार्श्वभूमीवर, माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शहनाज गिलने प्रथमच राघवबाबत भाष्य केले आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने राघवला "माझा खूप चांगला मित्र" असे संबोधले. ( Raghav Juyal)



शहनाज म्हणाली, "माझ्या मित्राचा चित्रपट येत आहे. कृपया त्याला पाठिंबा द्या. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचा चित्रपट यशस्वी होणं खूप महत्त्वाचं आहे."


यावेळी तिने राघवच्या संघर्षाचाही उल्लेख केला. "तो इंडस्ट्रीतील घराण्यातून आलेला नाही. त्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्या पहिल्या मुख्य भूमिकेच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी नक्की पाठिंबा द्यावा," असे आवाहनही शहनाजने केले. ( Bollywood News)



शहनाजच्या या वक्तव्यानंतर दोघांच्या नात्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा वेग आला असला, तरी तिने राघवला केवळ "चांगला मित्र" असेच संबोधले असून डेटिंगच्या चर्चांबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.


दरम्यान, शहनाज गिल सध्या तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'इश्कनामा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जय रंधावा प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या