Vinayak Raut : विनायक राऊत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; लवकरच अटक होण्याची शक्यता

गिरिजा राऊत यांच्या तक्रारीमुळे अडचणी वाढल्या, विनायक राऊत यांना होणार लवकरच अटक 



मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या विरोधात त्यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणात ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासासाठी पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vinayak Raut News)


गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत तसेच कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील (Thane) कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात विनायक राऊत यांच्यासह पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला असून पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाकडून कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Girija Raut Complaint)




 

गिरिजा राऊतांची पत्रकार परिषद 


गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत आणि पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. संततीप्राप्तीसाठी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून अमानुष वागणूक दिली, गोमूत्र पिण्यास भाग पाडले, विविध अघोरी विधी करण्यास भाग पाडले, तसेच डोक्यावरील केस काढण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Uddhav Thackeray)



याशिवाय, पती वैवाहिक संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याची बाब लग्नापूर्वी लपवण्यात आली, लग्नानंतर मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला, मुंबईत मोठा बंगला असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली, प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात राहावे लागले आणि स्वतःची नोकरी सोडण्यास भाग पाडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यात आले, असेही आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.




पाच जणांवर गुन्हा दाखल 


या प्रकरणात गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत, गितेश विनायक राऊत, शामल विनायक राऊत, सुरेखा सरफरे आणि राजेश सरफरे या पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


दरम्यान, या सर्व आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यांची सत्यता तपासातून आणि न्यायालयीन सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Political News)

Comments
Add Comment

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील एमआयसीयू खाटांची संख्या पोहोचणार ३५वर

- नवीन २५ खाटांचा एमआयसीयू कक्षाची केली जाणार उभारणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात

Ration Card E-KYC Online : रेशन कार्डची घरबसल्या E-KYC कशी करायची? मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा

मुंबई : रेशन कार्डधारकांसाठी E-KYC (Electronic Know Your Customer) प्रक्रिया महत्त्वाची आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार

1986 Murder Case : चार दशकांपासून पोलिसांना चकवा; 1986 च्या हत्येतील आरोपीसह क्रिकेट पंचावर हल्ला करणाऱ्याला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना वेगवेगळ्या प्रकरणांत अटक केली आहे. विशेष

Amul Lactose Free Milk Packaging : दूधाच्या पॅकेटवरून गोंधळ; व्हायरल व्हिडीओनंतर अमूलने दिली स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : इंस्टाग्रामवर अमूल लॅक्टोज-फ्री दुधाच्या पॅकेटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला