N.L. Dalmia School Fire : मीरा रोडमध्ये मोठी दुर्घटना टळली! एन.एल. डालमिया शाळेच्या इमारतीला भीषण आग; विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले

मीरा रोड : मीरा रोड येथील हरे कृष्ण मंदिराजवळ असलेल्या एन.एल. डालमिया शाळेच्या (N.L. Dalmia School Fire) इमारतीच्या वरच्या मजल्यावर बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही घटना शाळा सुरू होण्यापूर्वी घडल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.


आगीची माहिती मिळताच मीरा-भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी वेगाने कारवाई करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आग पुन्हा भडकू नये म्हणून सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू असून संपूर्ण इमारतीची तपासणी केली जात आहे. (N.L. Dalmia School Fire)



शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज :


प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. तांत्रिक पथक घटनास्थळी पाहणी करून विद्युत यंत्रणा आणि इमारतीची सुरक्षितता तपासत आहे. (N.L. Dalmia School Fire)



शाळा सुरू होण्यापूर्वीच घटना :


ही घटना सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी घडल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. काही मिनिटे उशीर झाला असता तर शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. (N.L. Dalmia School Fire)



प्रशासनाकडून तपास सुरू :


घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने परिसर सुरक्षित करत परिस्थिती नियंत्रणात आणली. शाळेच्या इमारतीचे नुकसान किती झाले, याचा पंचनामा करण्यात येत असून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे शाळांमधील अग्निसुरक्षा उपाययोजना आणि विद्युत यंत्रणांच्या नियमित तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्थांना अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. (N.L. Dalmia School Fire)




Comments
Add Comment

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील एमआयसीयू खाटांची संख्या पोहोचणार ३५वर

- नवीन २५ खाटांचा एमआयसीयू कक्षाची केली जाणार उभारणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात