Aadhaar Name Change : लग्नानंतर आधार कार्डवर नाव कसं बदलायचं ?

तुम्हाला माहितीये का?


लग्नानंतर आधार कार्डवर नाव बदलण्याची योग्य पद्धत कोणती ?


Mumbai : तुम्हाला माहितीये का? लग्नानंतर एका छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांना बँकांची कामे आणि सरकारी योजनांचा लाभ घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे - आधार कार्डवरील नाव न बदलणे! लग्नाआधी मुलीच्या आधार कार्डवर तिच्या वडिलांचं नाव असतं, पण लग्नानंतर सासरचं नाव कसं लावायचं? अनेकांना वाटतं ही खूप किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण तसं अजिबात नाही. आज मी अत्यंत सोप्या पद्धतीत सांगणार आहे नेमकं कसं करायचं.(Adhar Card)






सर्वांत आधी हे समजून घेऊया की हे अपडेट का गरजेचं आहे. सध्याच्या काळात नवीन बँक अकाउंट उघडण्यापासून ते पॅन कार्ड अपडेट करण्यापर्यंत, किंवा शासनाच्या कोणत्याही लाडक्या योजनेचा लाभ घेण्यापर्यंत... प्रत्येक ठिकाणी तुमचं आधार कार्ड अपडेट असणं अनिवार्य आहे. जर आधार कार्डवरील नाव तुमच्या सध्याच्या नावाशी मॅच झाले नाही, तर तुमची महत्त्वाची कामे अडकू शकतात. आता पाहूया या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे लागतात. आधार कार्डवर नाव बदलण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने दोन पैकी एका अधिकृत कागदपत्राची गरज असते, पहिला पर्याय - Marriage Certificate : लग्नानंतर तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेतून विवाहाची नोंदणी करून हे प्रमाणपत्र सहज मिळवू शकता. दुसरा पर्याय - (State Gazette): जर काही कारणास्तव तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसेल, तर दुसरा कायदेशीर पर्याय म्हणजे राजपत्र किंवा गॅझेट. राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये नावात बदल केल्याची अधिकृत नोंद करून तुम्ही हे प्रमाणपत्र काढू शकता."



ही कागदपत्रे हातात आल्यावर पुढची पायरी अगदी सोपी आहे. या दोन पैकी कोणतंही एक मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या 'आधार सेवा केंद्रात' जायचं आहे. तिथे नाव बदलाचा फॉर्म भरायचा आहे. या अधिकृत नाव बदलाच्या प्रक्रियेसाठी शासनाने फक्त १०० रुपये इतके नाममात्र शुल्क निश्चित केले आहे. केंद्रचालक तुमचे कागदपत्र स्कॅन करून बायोमेट्रिक्स घेतील आणि तुम्हाला एक पोचपावती देतील. तुम्हाला ही पोचपावती जपून ठेवायची आहे. यानंतर जास्तीत जास्त ९० दिवसांच्या आत तुमच्या आधार कार्डवरील नाव अपडेट होते. तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा नंबर टाकून तुमचं स्टेटस घरबसल्या ट्रॅक करू शकता. तर, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या ओळखीत ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे अशा नवविवाहित जोडप्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्रहारन्यूजलाईनला आताच फॉलो करा!"

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे