Voter Card Update : मतदान कार्डासाठी आता 'SIR' बंधनकारक; काय आहे हा नवीन बदल ?

तुम्हाला माहितीये का?


नवीन मतदान कार्ड काढताना 'SIR' नियम काय आहे ?


Mumbai : तुम्हाला माहितीये का? आता जर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा SIR लागणार आहे. पण SIR म्हणजे काय नक्की ? तर Special Intensive Revision म्हणजे विशेष सखोल पुनरावलोकन असा अर्थ होतो. ही भारत निवडणूक आयोगाकडून राबवली जाणारी एक विशेष मोहीम आहे. आता SIR निवडणूक आयोगाने हा सर्वात मोठा बदल केलेला आहे. अनेक तरुण-तरुणी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान कार्ड काढण्यासाठी जातात, पण त्यांना या नवीन नियमाची कल्पना नसते. आज मी तुम्हाला या नवीन अपडेटबद्दल आणि संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगणार आहे...







आधीच्या प्रक्रियेवर नजर टाकल्यास, नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी केवळ जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता त्यात आणखी काही कागदपत्रांची वाढ करण्यात आली आहे. नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर ६ भरावा लागतो. हा फॉर्म भरताना आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ज्या राज्यांमध्ये SIR ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या राज्यांमध्ये फॉर्म ६ सोबत 'SIR सेक्शन' ॲड करण्यात आला आहे. हा 'SIR सेक्शन' भरल्यानंतरच तुमच्या मतदान कार्डची पुढची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे फॉर्म भरताना हा भाग काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे नवीन मतदान कार्डासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ते सांगते...जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड,


लायसन्स, टीसी म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट, भारतीय पासपोर्ट, या सर्व कागदपत्रांसोबतच तुमच्या आई-वडिलांचा SIR देखील गरजेचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी नवीन मतदान कार्ड काढण्याचा विचार करत असेल, तर ही सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा!
Comments
Add Comment

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Mumbai Drug Bust : अरे बापरे...! तब्बल ३.५० कोटींचे अमली पदार्थ; आरोपीची 'ती' एक चूक नडली अन् पोलिसांची थेट धाड

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत ३०२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची

Ahilyanagar : पत्रकारावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरातून तिघे ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील पत्रकार सुशील थोरात आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करून

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Nashik : कांद्याच्या दरात वाढ, दर नियंत्रणासाठी ‘कांदा एक्स्प्रेस’ सुरू

Nashik : देशभरात कांद्याच्या दरात तब्बल ५९ टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारने बाजारातील कांद्याचा पुरवठा