BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील सुरक्षात्मक बाबींचा घेतला आढावा


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि क्षेपणभूमीच्या ठिकाणी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आगामी पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा विचार करून सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक तयारी पूर्ण ठेवावी. प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र प्रमाणित मानक पद्धती (एसओपी) तयार करावी, तसेच सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. (BMC)



पुणे येथील मोशी येथे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा आणि सुरक्षात्मक बाबींचा डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवार १४ जुलै २०२६ राेजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून फेरआढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प) अविनाश काटे, संबंधित अधिकारी, प्रकल्प सल्लागार तसेच विविध घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे कंत्राटदार यावेळी उपस्थित होते. ( Mumbai Municipal Corporation)



अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी सांगितले की, डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची उंची निर्धारित मर्यादेत ठेवावी. प्रकल्प परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवावी. क्षेपणभूमी परिसरातील शेड, कार्यशाळा, देखभाल कंटेनर आदी सर्व संरचनांचे स्थिरता परीक्षण (स्टॅबिलिटी ऑडीट) तातडीने पूर्ण करावे. पावसाळ्याच्या अनुषंगाने, पर्जन्य जलवाहिनी आणि पृष्ठभागीय जलनिस्सारण व्यवस्थेचे सर्वंकष परीक्षण करावे. कांजूरमार्ग, देवनार आणि मुलुंड येथील बायोमायनिंग प्रकल्पांमधील उत्खनन पद्धतींचा आढावा घेऊन सुरक्षित कार्यपद्धती सुनिश्चित करावी. तसेच, अस्थिर उत्खनन क्षेत्रांची ओळख करून तेथे योग्य बॅरिकेडिंग करण्यावर भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. ( Waste Disposal Sites)



देवनार येथील कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (वेस्ट-टू-एनर्जी) प्रकल्प आणि वर्षोनुवर्षे साचून असलेल्या कचऱ्यात (लिगसी वेस्ट) आग व मिथेन वायूशी संबंधित धोक्यांचे परीक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. घनकचऱ्यापासून निर्मित इंधन (रिफ्यूज डिराईव्हड फ्यूएल - आरडीएफ) साठ्यामुळे आगीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. सर्व कर्मचारी व कामगारांसाठी नियमित सरावांचे (मॉक ड्रिल) आयोजन करावे. रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशन (आरटीएस) परिसरात कोणत्याही प्रकारचा साहित्यसाठा ठेवू नये. प्रमुख अभियंता आणि उप प्रमुख अभियंता यांनी आठवडाभरात सर्व प्रकल्पस्थळांना भेट देऊन सुरक्षा आणि कार्यपद्धतींच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, असे निर्देशही डॉ. शर्मा यांनी यावेळी दिले.



दरम्यान, सुरक्षितता ही प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. डम्पिंग ग्राऊंउ खचणे, आग लागणे, यंत्रसामग्री अपघात किंवा उत्खननाशी संबंधित कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संभाव्य धोके पूर्वीच ओळखून त्यांचे सातत्याने निरीक्षण केले जावेत. अभियांत्रिकी तसेच कार्यान्वयन स्तरावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे त्यांचे निर्मूलन करणे ही संबंधित विभाग आणि कंत्राटदारांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे