मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी केलेले खुलासे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मांडली. मणी यांच्या दाव्यांमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "मणी यांनी केलेले दावे प्रचंड हादरवून सोडणारे आहेत. या विषयातील काही संशयास्पद बाबी मी स्वतः तत्कालीन विधानसभेत उपस्थित केल्या होत्या. त्या काळात मुंबई हल्ल्याबाबत आधी काय 'इंटेलिजन्स' (गुप्तचर माहिती) मिळाले होते, याचे पुरावे मी विधानसभेच्या पटलावर मांडले होते. आता गृह मंत्रालयातील एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडूनच असे वक्तव्य समोर आल्याने या संशयाला बळकटी मिळत आहे. हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्याने या संदर्भात योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे."
Shalarth ID Scam : नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील कोट्यवधींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणेने आता कठोर पाऊले ...
View this post on Instagram
केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी नवी दिल्लीत एका मुलाखती दरम्यान २६/११ च्या मुंबई हल्ल्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, हा दहशतवादी हल्ला म्हणजे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' यांच्यातील एक प्रकारे 'फिक्स मॅच' (पूर्व-नियोजित कट) होता. मणी यांनी दावा केला की, "पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेल्यामुळेच विरोधकांचा 'हिंदू दहशतवाद' हा कथित नॅरेटिव्ह तयार करण्याचा कट अपयशी ठरला. जर कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर या संपूर्ण जिहादी हल्ल्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडण्याचा पूर्ण प्रयत्न झाला असता."(News)
- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या 'वाढवण बंदरा'ला जोडून दापचरी ...
काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप
- आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मणी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला. २००६ मध्ये दिग्विजय सिंह यांनी गृह मंत्रालयाकडे 'हिंदू दहशतवादाशी' संबंधित प्रकरणांची माहिती मागितली होती, परंतु तत्कालीन शासकीय अभिलेखात (Record) असा कोणताही उल्लेख किंवा खटला नोंद नव्हता. इतकेच नव्हे तर, २०१० पर्यंत गृह मंत्रालयाच्या अधिकृत दप्तरात 'हिंदू दहशतवाद' असा कोणताही शब्द अस्तित्वात नव्हता, असे मणी यांनी स्पष्ट केले. - यासोबतच, गुजरात मधील बहुचर्चित 'इशरत जहाँ' चकमक प्रकरणाचा उल्लेख करत मणी यांनी खळबळजनक आरोप केला. या प्रकरणाचा गैरवापर करून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना राजकीय दृष्ट्या लक्ष्य करण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता, असेही मणी यांनी म्हटले आहे.






