मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि कंपनीचे संचालक सुमंतराव पेंढरकर (Sumantrao Pendharkar) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग, सामाजिक आणि आयुर्वेद क्षेत्रात शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शोकसंदेशात म्हटले की, "विकोला जागतिक ओळख मिळवून देणारे सुमंतराव पेंढरकर (Sumantrao Pendharkar) यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान उद्योगरत्न गमावले आहे. त्यांच्या जाण्याने उद्योगविश्वाची मोठी हानी झाली असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पुढे सांगितले की, साधी राहणी, तत्त्वनिष्ठ विचार आणि गुणवत्तेप्रती असलेली कटिबद्धता या बळावर सुमंतराव पेंढरकर (Sumantrao Pendharkar) यांनी 'विको' या भारतीय ब्रँडला देशाबाहेरही वेगळी ओळख निर्माण करून दिली. आयुर्वेदिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.
परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या ...
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डोंबिवलीच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासातही पेंढरकर (Sumantrao Pendharkar) कुटुंबाच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. "डोंबिवलीच्या जडणघडणीत पेंढरकर कुटुंबाने दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. उद्योगासोबतच समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली," असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पेंढरकर (Sumantrao Pendharkar) कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, "या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पेंढरकर कुटुंबीय आणि विको उद्योगसमूहाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो," अशी प्रार्थना केली.
बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत जन सुराज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ...
सुमंतराव पेंढरकर (Sumantrao Pendharkar) यांच्या नेतृत्वाखाली 'विको'ने आयुर्वेदिक टूथपेस्ट, त्वचा निगा उत्पादने आणि अन्य हर्बल उत्पादनांद्वारे देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान मिळवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार झाला. त्यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राने एक दूरदृष्टी असलेला उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. (Devendra Fadnavis)
‘विको’ला जागतिक ओळख मिळवून देणारे, विको लॅबोरेटरीजचे संचालक सुमंतराव पेंढरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान उद्योगरत्न गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. साधी राहणी, तत्त्वनिष्ठ विचार यांच्या बळावर त्यांनी ‘विको’ला जागतिक भरारी दिली आणि… pic.twitter.com/PONihbz0X7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2026






