पुणे : पुण्यातील जेजुरीजवळ (Jejuri) ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेल्या भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच वारीत आणखी एक अपघात घडला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात भरधाव पिकअपने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १९ मधील वसंतराव गवते हे नगर–सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडत असताना भरधाव पिकअपने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. (Jejuri Accdent)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) ...
जखमी वसंतराव गवते यांना तातडीने अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी रात्री साकत गावात मुक्कामी होता. मंगळवारी सकाळी पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रुईछत्तीशी परिसरात हा अपघात घडला.
अपघातानंतर पिकअप चालकाने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. नगर तालुका पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून चालकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भावनिक ईमेल ...
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जेजुरीजवळ भरधाव ट्रकने ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीला धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वारी मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




