BMC Tree Planting : दहा बाधित झाडांच्या बदल्यात महापालिका लावणार २३७ झाडे

-सचिन धानजी



मुलुंडमधील स्कायवॉकच्या बांधकामात १० झाडे बाधित


झाडे लावण्यास मुंबईत जागा नसल्याने वनविभागाकडे घेतली महापालिकेने धाव


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेण्यात आलेल्या मलुंड टी' विभागातील महाराणाप्रताप चौक, एल बी एस रोड येथे स्कायवॉकचे (Skywalk) काम करण्यात येणार आहे. या स्कायवॉकच्या कामामध्ये १० झाडे बाधित होत असून त्यातील ७ वृक्ष कापली जाणार आहेत. तर ३ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. मात्र, या दहा बाधित झाडांच्या बदल्यात मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) एकूण २३८ नविन वृक्ष (Tree) लावण्यात येणार आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने मुलुंड 'टी' विभागातील महाराणाप्रताप चौक एल बी एस रोड येथे आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम करण्यात येत आहे. या स्कायवॉकच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून या स्कायवॉकच्या बांधकामासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. परंतु या स्कायवॉकच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणमध्ये एकूण १० वृक्ष बाधित होत असल्याचे दिसून आले. यामध्ये ७ वृक्ष कापणे, ३ वृक्षांची पुनर्रोपण करणे तसेच ५ झाडे आहे तिथे ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर आता ही झाडे कापण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. या दहा बाधित झाडांच्या बदल्यात एकूण २३८ नविन वृक्ष लावण्याचे महापालिकेने नमुद केल आहे.



परंतु सध्यस्थितीत, उ‌द्यान विभागाच्या परवानगी मध्ये नमूद केल्या प्रमाणे २३८ नवीन वृक्षांची लागवड करण्याकरिता व ३ वृक्ष पुनर्रोपण करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्या कारणाने, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ म." यांना जागा उपलब्ध करून देण्याकरिता विचारणा करण्यात आली आहे. त्यांनी यासाठी तयारी दर्शवली असून वृक्षलागवड (Tree Plantation) तथा वृक्ष पुनर्रोपण तसेच वृक्ष तोडणी करण्याकरिता एकूण रक्कम. २४.९५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यानुसार हा निधी महाराष्ट्र वन विकास महामंडळ यांना देण्यात येणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर महामंडळाच्यावतीने पनवेल रेंज मधील वडघर येथील ०.२१ हेक्टर जागेवर या २३८ झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच या वृक्ष लागवड व ७ वर्ष संगोपन ही कामे वन विभागाच्यावतीने केली जाणार आहे. यामध्ये २३८ वृक्ष लागवड आणि सात वर्षांचे संगोपन याकरता २१.१ ६ लाख रुपये, ३ वृक्षांचे पुनर्रोपण करून १ वर्ष संगोपन करणे याकरिता रक्कम रु.१लाख ९८ हजार रुपये, ७ वृक्षांचे वृक्षतोड करण्याकरिता १ लाख ८० हजार रुपये आदींचा यामध्ये समावेश असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai Smart Turf Policy : मुंबईत महापालिकेद्वारे 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण?

- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी. - भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची

Plastic Bottle Ban : मुंबई महापालिका सर्व कार्यालयांमध्ये पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सला बंदी

- महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख कार्यालये व

BMC News : दादर फुल बाजारमधील टाकाऊ फुलांच्या विल्हेवाटीसाठी अद्यायावत तंत्रज्ञान वापरा

- अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतनिधी) टाकाऊ फुलांची विल्हेवाट

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने