-सचिन धानजी
मुंबई : मुंबईतील यंदाचाही गणेशोत्सव पर्यावरण पुरक असावा यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून यंदाही मुंबईच्या गणेशोत्सव २०२६ साठी गणपती मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचा (णदतदहीे) पुरवठा करण्यात येणार आहे. मागील गणेशोत्सवात मूर्तिकारांना एकूण १०,८०० लिटर्स पर्यावरणपूरक रंगांचे मोफत वितरण करण्यात आले होते. आता यावर्षी मूर्तिकारांना २५,४०० लिटर्स पर्यावरणपूरक (Sustainable) रंगांचा करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
मुंबई शहरामध्ये गणेशोत्सव हा सर्वाधिक साजरा केला जाणारा सण आहे. गणपती मूर्ती सामान्यतः शाडूमाती, कागद, धातू, प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) इत्यादी घटकांपासून बनविण्यात येतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या प्रसारासाठी, मुंबई महानगरपालिकेतर्फे गणपती मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षी शाडूमातीचे मोफत वितरण करण्यात येते. तरीही, मूर्तिकारांकडून वापरण्यात येणारा रंग पर्यावरणपूरक नसल्याने त्या रंगामध्ये लिड, कॅडमिअम, क्रोमिअम, मर्क्युरी यांसारखे जड धातू असतात. हे जड धातू हे सागरी जलचर जीवांसाठी धोकादायक असते. त्यामुळे, मुबई महानगरपालिकेच्यावतीने मागील गणेशोत्सवात पर्यावरण पुरक रंग मूर्तीकारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गणेशोत्सव २०२५ साठी गणपती मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना एकूण १०,८०० लिटर्स पर्यावरणपूरक रंगांचे मोफत वितरण करण्यात आले होते.
महापालिकेने केले परिपत्रक जारी मुंबई : मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांमध्ये झाडे पडून झालेल्या दुघर्टनांची गंभीर दखल घेण्यात आली असून आता रस्त्याच्या ...
मागील वर्षीचा प्रतिसाद पाहता यंदाही म्हणजे गणेशोत्सव २०२६ साठी गणपती मूर्ती घडविणा-या मूर्तिकारांना २५,४०० लिटर्स पर्यावरणपूरक रंगांचा पुरवठा करण्याची तयारी केली आहे. यासाठी आता खरेदीची प्रक्रिया सुरु केली असून त्यानुसार संस्थेची निवडही करण्यात आली आहे. या रंगाचा पुरवठा करण्यासाठी एकता एंटरप्रायझेस या संस्थेची निवड करण्यात आली असून याकरता १ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार याबाबतच्या खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतर एक महिन्यात याचा पुरवठा केला जाणार आहे.





