- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी.
- भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची धोरण बनवण्याची ठरावाची सूचना मंजूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनधिकृत व अनियंत्रित पद्धतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम टर्फ आणि बॉक्स क्रिकेटच्या मैदानांना शिस्त लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने "अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ पॉलिसी" लागू करावी, या संदर्भातील ठरावाची सूचना महापालिकेत सर्वानुमते मंजूर करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी मांडलेल्या या ठरावाला मंजुरी मिळाल्याने आता याबाबत धोरण बनवण्यात येणार आहे. (Mumbai Smart Turf Policy)
- महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख कार्यालये व आस्थापनांमध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या ...
"मुंबईला क्रीडाप्रेमी शहर बनवताना नागरिकांच्या स्वास्थ्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. याचा उद्देश टर्फ बंद करण्याचा नसून त्यांना आधुनिक व कायदेशीर चौकटीत आणण्याचा आहे. ठराव मंजूर करत आता महापालिका आयुक्तांनी यावर तातडीने अंमलबजावणी अहवाल सादर करावा, याबाबत अभिप्राय सादर करण्यासाठी पाठवला आहे. (Mumbai Smart Turf Policy)
१,५०० हून अधिक टर्फला होणार मदत :
मुंबईत मोकळ्या मैदानांची कमतरता असल्याने गेल्या काही वर्षांत १,५०० हून अधिक टर्फ सुरू झाले आहेत. मात्र स्पष्ट नियमावली नसल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा आणि शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा ठराव मंजूर झाल्यामुळे टर्फ खेळाला मदत होणार आहे. (Mumbai Smart Turf Policy)
- अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतनिधी) टाकाऊ फुलांची विल्हेवाट लावण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची चाचपणी ...
'खेलो मुंबई' ॲपद्वारेच बुकिंग :
सर्व टर्फची नोंदणी, ऑनलाइन आरक्षण, परवानग्या आणि महसूल व्यवस्थापन महापालिकेच्या 'खेलो मुंबई' ॲपद्वारेच बंधनकारक केले जाईल. यामुळे रोख व्यवहार बंद होऊन पूर्ण पारदर्शकता येईल. विषारी रबर कणांवर बंदी: खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या व कर्करोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या निकृष्ट रबर कणांवर बंदी घालून केवळ पर्यावरणपूरक साहित्याचा वापर सक्तीचा केला जाईल. (Mumbai Smart Turf Policy)
छत जाळी अनिवार्य:
सुरक्षेच्या दृष्टीने आणि निवासी भागातील उपद्रव टाळण्यासाठी सर्व टर्फवर संरक्षणात्मक छत जाळी बसवणे बंधनकारक असणार आहे. (Mumbai Smart Turf Policy)