BMC News : महापालिका स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधकांच्या आरोपांचा असा घेतला समाचार, म्हणाले..

मुंबई : महापौरांच्या (Mayor) पाठिशी अवघ्या सभागृहाने राहायला हवे, तिथे आपण महापौरांचा राजीनामा मागता? महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागता? पण मी आज या सभागृहात सांगतो. कुणीही राजीनामा (Resignation) मागू द्या. आपला राजीनामा जर मागितला तर हे सभागृह त्या आयुक्तांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार. याचे कारण आम्हाला मुंबईचा (Mumbai) विकास करायचा आहे. आयुक्तांनी मुंबई मेट्रो (Mumbai Metro), कोस्टल रोडचे (Coastal Road) काम केलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखाली त्या मुंबईचा विकास करतील. म्हणून आम्हाला ते हव्या आहेत, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांची अस्त्रे परतवून लावली.


मुंबईतील पावसाळ्यातील (Rain) दुर्घटनाबाबत उपाययोजना करण्याबाबत आयोजित तातडीच्या सभेत विरोधकांचा समाचार घेत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी करून करून भागले देव पुजेला लागले अशा शब्दांत उबाठाचा समाचार घेतला. मागील सत्ताकाळात जेव्हा विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या महापौर होत्या तेव्हा विशेष सभांसाठी चार पत्र दिली होती. पण एकाही पत्राची दखल घेत त्यांनी विशेष सभा लावली नाही. या विशेष सभा कंगना राणावत यांच्या घरावरील कारवाई..तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांचा विरोधात अविश्वास ठराव .. महापालिका रुग्णालये, नर्सिंग होम, त्यातील अग्निसुरक्षा यांच्या उपाययोजना आदींचा बाबींवर चर्चा करण्यासाठी या विशेष सभांची मागणी केली होती. पण त्यांनी या विशेष सभा आम्हाला दिल्या नाही पण काळ कोणासाठी थांबत नाही, पण काळ कुणावर सुड उगवल्याशिवाय राहत नाही हे लक्षात घ्या. तो भूतकाळ आ वासून उभा आहे. त्याला सामोरे जाण्याचे धाडस दाखवा. आपण जेव्हा आरोप करतो, तेव्हा भूतकाळ नाही विसरायचा. राजकारण नाही करायचे. विशेष सभेसाठी महापालिका सभागृहात पाऊल टाकले, तेव्हा काय दिसले, काळे फुंगे लावलेले होते कार्यालयात, हे काय ? राजकारण नाही करायचे, तर मग श्रीराम का आठवला? मग आपल्याला प्रश्न विचारतो, तुमच्या नेत्यांचे यू ट्यूबर भाषण आहे. 'श्रीराम म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो', मग आता तुम्हाला काय म्हणायचे ते आम्हाला सांगा?. ते जर नसेल बोलले तर मी पदाचा राजीनामा देवून निघून जाईन. नाही तर तुमच्या नेत्यांना जावून विचारा. तो व्हिडीओ खोटा निघाला तर मी राजकारणातून निवृत्त होईन असेही आव्हान उबाठाला दिले.



महापौरांनी राजीनामा द्या? नैतिकता जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, अशी मागणी होते. अरे आपण महापौरांचे कौतूक करायला हवे, ज्या ज्या वेळेला या घटना घडल्या तिथे तिथे त्या पोहोचल्या.
त्यांचा आपण राजीनामा मागता ना मग सन २०१३ ते जुलै २०१८ या कालावधीत २१,४५२ झाडे /फांद्या पडल्या. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला, २५४ जखमी झाले. तेव्हा कुणाचा राजीनामा मागितला आपण? . २९ जुलै २०१७ कमला मिल दुर्घटनेत १४ जणांना जीव गमवावा लागला, तेव्हा कुणाचा राजीनामा मागितला. महापौरांचाच राजीनामा आपण मागत नाही तर आयुक्तांचाही राजीनामा मागता.आपल्या पक्षाच्या सन्मानीय आमदारांनी विरोधी परिषदेत ही मागणी केली. या आयुक्तांना मेट्रो वूमन म्हणून आपण उपाधी दिली त्यांचा राजीमाना मागता. अहो, उणदुणे ३ महिने झाले त्यांना या पदावर विराजमान होऊन. ज्यांनीमेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्प साकारत मुंबईचा चेहरा बदला, त्यांचा राजीनामा मागता. वरून त्यांच्या नावाने घोषणाबाजी करून त्या सभागृहात नाही म्हणून गोंधळ घालता? मग आपल्या सत्ता काळात आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त असून ते उत्तर द्यायला समर्थ आहे, अशी उत्तरे आपणच दिली होती ना? आम्ही ती ऐकली आहेत. आयुक्त नाही आले तर अतिरिक्त आयुक्त समर्थ आहेत, तर आज तेच उत्तर आम्ही आपल्याला सांगतो, सोयीचे राजकारण नाही चालणार नाही,असे सांगत शिंदे यांनी उबाठाचा खरा चेहरा सभागृहाचा समोर आणला.


आज विरोधी पक्षाची एक परंपरा आहे, अनेक विरोधी पक्षनेते होवून गेले. यात आर आर सिंह पासून रवी राजा पर्यंत विरोधी पक्षनेत्यांची नावे घेत शिंदे यांनी कुठला विरोधी पक्षनेता महापौरांच्या दालनात घुसला नाही. तोही समाज माध्यमांना घेवून. कोणत्याही विरोधी पक्षनेत्यांनी दादागिरी केली नाही. पण आता काहींचा स्वप्नभंग झालाय, देवेन वर्मा एका चित्रपटात जसा स्वप्नात जातो, आणि त्याला त्याचे सहकारी लौट आओ असे सांगत असतात, तशी त्यांची अवस्था, माझ्या पक्षाची जास्त नगरसेवक आले असते तर मी महापौर झाली असते, या स्वप्नातून त्या बाहेरच आलेल्या नाही असे सांगत किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला..आज सभागृहाची परिस्थिती या स्वप्न भंगामुळे झाली आहेअसे सांगत शिंदे ६ ऑक्टोबर २०१९ गटनेत्यांचा बैठकीतील एका ठरावाचा पेपर दाखवत कंत्राटदार दुर्लक्षतेमुळे दुर्घटना घडल्यास आर्थिक मदत देण्यास आकस्मित निधीची तरतूद आणि त्यातून ही वसूल केला जाईल,अशा अटींचा समावेश निविदेत केली जाणार होती. त्यामुळे उपाययोजना करायची असेल याला हात घाला. आपण एक झालो तर कंत्राटदाराला आळा बसल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.


यावेळी त्यांनी १५ जून २०१९ रोजीचे. उबाठा आमदार सुनील प्रभू यांनी तत्कालीन आयुक्तांना दिलेल्या पत्राची प्रत दाखवून झाडांची छाटणीसाठी नवीन निविदा राबवताना वृक्ष सांगोपन तज्ज्ञ(आर्बोरिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्तपणे मॅक लिफ्टसह कामगारांच्या सुरक्षेचा समावेश असावा अशी अट निविदेत घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण सुनील प्रभू यांनी आक्षेप घेतला आणि मग पुन्हा नव्याने अटी बदलून निविदा मागवल्या. त्यामुळे हा घेतलेला निर्णय पुन्हा घेत उपाययोजना कराव्या लागतील. उपाययोजना करायच्या असतील आपण सोबत आहोत, पण राजकारण केले जात असेल तोडीस तोड उत्तर देईन असाही त्यांनी भरला.



१६ जून २०२३ मॅनहोल्स संरक्षणक जाळ्या सबवण्यासाठी कृती आराखडा तयार करणार असल्याची घोषणा तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, पी वेलरासू यांची माहिती दिलेले पत्रक फडकावत उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार ही कामे करायची असल्याचे सांगणारे हे जर नगरसेवकांसोबत न्यायालयाची दिशाभूल करत असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करणार? या जाळ्या जर तेव्हाच बसविल्या असत्या तर कदाचित अस्लम शेख वाचले असते.


केवळ महापौरांचा व आयुक्तांचा राजीनामा मागणार असाल तर हे योग्य नाही. त्या सुपर वूमन व्हाव्यात अशा शुभेच्छा देता. पण त्यांच्या पायात जर आपणच राजकारणाच्या बेड्या टाकायला गेलो तर त्या कशा होणार ? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानत शिंदे यांनी आश्विनी भिडे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकारी मुंबईला त्यांनी दिल्या आहेत. मुंबईची पुरसदृश्य स्थिती कमी करण्यासाठी ते कृती आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी ते देणार आहेत.


ज्यांचा आपल्या सहकाऱ्यांच्या पत्रावर विशेष सभा लागल्यानंतर आकांडतांडव सुरु होतो, त्यांच्याबद्दल काय बोलावे, असे सांगत शिंदे ब्यांनी सभागृहात विरोधी पक्षाकडून चालत असलेल्या कामकाजाबाबत दुःख व्यक्त केले. कोणत्या महापालिका आयुधांचा वापर करायचा हे त्यांना माहीत नाही. ही विशेष सभा चांगल्या उपाययोजना मांडण्यासाठी झाली असती तर अजून बरे वाटले असते सांगत आपण नवीन आलेल्या नगरसेवकांसमोर काय आदर्श ठेवतो याबाबत चिंता व्यक्त केली.

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात