Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वेला (Kokan Railway) मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्याची अपेक्षा आहे.


रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनुसार, गाडी क्रमांक १५०८७ (CSMT–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस) आणि गाडी क्रमांक १५०८८ (सावंतवाडी रोड–CSMT एक्स्प्रेस) या गाड्या दररोज धावणार आहेत. मात्र, या रेल्वेच्या प्रत्यक्ष उद्घाटनाची तारीख आणि वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. (Kokan Railway)



प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे निर्णय :


कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. मात्र, उपलब्ध नियमित गाड्यांची संख्या कमी असल्याने जवळपास प्रत्येक गाडीत मोठी गर्दी पाहायला मिळते. यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, कोकण विकास समिती आणि महाराष्ट्र रेल्वे परिषद यांच्याकडून सातत्याने नव्या नियमित रेल्वेची मागणी केली जात होती. अखेर या मागणीची दखल घेत रेल्वे बोर्डाने नव्या एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. (Kokan Railway)



या स्थानकांवर मिळणार थांबा :


नवीन एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. (Kokan Railway)



कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण :


या निर्णयाचे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, "CSMT–सावंतवाडी रोड नियमित एक्स्प्रेसमुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. आता रेल्वे प्रशासनाने दादर–रत्नागिरी नियमित रेल्वेही सुरू करावी, अशी आमची अपेक्षा आहे." नवीन एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्याने गणेशोत्सवाच्या आधीच कोकणातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता सर्वांचे लक्ष या रेल्वेच्या वेळापत्रक आणि पहिल्या प्रवासाच्या घोषणेकडे लागले आहे. (Kokan Railway)

Comments
Add Comment

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही, अध्यक्ष सदा सरवणकरांनी दिली माहिती

सिद्धिविनायक मंदिरातून दर्शनासाठी पैसे घेणारे ९ कर्मचारी बडतर्फ मुंबई : श्री सिद्धिविनायक

BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर,

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट

Navanath Ban : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नवनाथ बन यांची टीका; भाजपच्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार

Ambulance Services : ‘अँम्ब्युलन्स’ सेवांच्या मनमानी भाडेवसुलीला लगाम

- राज्यात नवे धोरण येणार; प्रत्येक रुग्णवाहिकेवर असणार शासनाची डिजिटल नजर मुंबई : राज्यातील रुग्णवाहिका