BMC : भाजपच्या दोन शिलेदारांनी विरोधकांच्या तंगडया घातल्या त्यांच्याच गळ्यात

मुंबई : मुंबईत (Mumbai) पावसाळ्यात घडणाऱ्या दुघर्टनांबाबत आयोजित केलेल्या तातडीच्या सभेमध्ये सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेला (Shivsena) टार्गेट करत महापौर आणि महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांचा सत्ताधाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही पत्र देवूनही विशेष सभा घेत नाही. तसेच आयुक्त सभागृहात उपस्थित राहण्याच्या मुद्दयावरून सत्तााधाऱ्यांवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाचा समाचार घेत भाजपच्या दोन शिलेदारांनी त्यांच्या तंगड्या त्यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला.


मुंबई महापालिका (BMC) सभागृहात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या दुघर्टनांबाबत उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या तातडीच्या सभेमध्ये विरेाधी पक्षाने या घटनांच्या निषेध करत सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्यास सुरुवात केले. तसेच महापौर आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ३० मार्च २०२६ रोजी पत्र देऊनही विशेष सभा घेण्यास दिली नाही. तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनासह सत्ताधारी पक्षालाच जबाबदार धरतानाच आयुक्त या सभेत उपस्थित का नाही म्हणून ही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याचा समाचार घेताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी किशोरी पेडणेकर या महापौर असताना विरोधी पक्षाच्यावतीने तीन ते चार वेळा विशेष सभा घेण्याची मागणी करणारी पत्रे सभागृहात वाचून दाखवत विद्यमान विरोधी पक्षनेत्यांची बोलतीच बंद केली. तुम्ही सत्तेत असताना आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवली नाही आणि आता विरोधी पक्षात बसताच आपल्याला अन्याय होत असल्याची उपरती झाली का असा सावल करत , काळ कोणासाठी थांबत नाही, पण काळ कुणावर सुड उगवल्याशिवाय राहत नाही असे खडे बोल सुनावले.


तो भूतकाळ आ वासून उभा आहे त्याला सामोरे जाण्याचे धाडस दाखवा. आणि आपण आरोप करतो तेव्हा भूतकाळ नाही विसरायचा असेही सांगत त्यांचे कान टोचले. तर याच महापौर असताना आम्ही जेव्हा आयुक्तांना सभागृहात बोलवा म्हणून मागणी करायचो तेव्हा आयुक्तांच्या वतीने उत्तरे द्यायला त्यांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त हे सक्षम असल्याचे आम्हाला सांगितले जात होते. मग आता तेच उत्तर आम्हीही आपल्याला देतो,असे सांगत विरोधीपक्षनेत्यांची बोलतीच बंद करून टाकली.



सभागृहात राजकारण करायचे नाही असे आम्हाला सांगता, मग कार्यालयाबाहेर काळे फुंगे लावले, हे काय होतं? राजकारण नाही करायचे तर मग आता श्रीराम का आठवला? मग मी आपल्याला प्रश्न विचारतो की, तुमच्या नेत्यांचे यु ट्युबवर भाषण आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, श्रीराम म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो, मग आता तुम्हाला काय म्हणायचे ते आम्हाला सांगा? तुमच्या नेत्याचे भाषण आहे युट्युबवर. मी दाखवतो, आणि नसेल बोलले तर मी पदाचा राजीनामा देवून निघून जाईन. तो व्हिडीओ (Video) खोटा निघाला तर राजकारणातून निवृत्त होईन,असे सांगत उबाठाला आव्हानच दिले.



मुंबईकरांच्या जीवापेक्षा कुणीही कंत्राटदार मोठा नाही


"या सभागृहात आमच्या मागणीनुसार विशेष सभा घेत नसल्याचा कांगावा करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. २२ जून रोजी पाणी पुरवठ्यावर ११ वाजेपर्यंत सभागृहात चर्चा झाली. १८ जून रोजी नालेसफाईवर चर्चा झाली. झाडांच्या मुद्दयावर ६६ ब अन्वये चर्चा केली. रात्री १२ वाजेपर्यंत चर्चा केली. आज आपण अशा कुठल्या विषयावर चर्चा केली. नालेसफाई, पाणी, झाडांवर चर्चा केली. तरीही आयुक्तच पाहिजे असे ते सांगतात. पण तेव्हा अतिरिक्त आयुक्त हे कसे योग्य आहेत, हे हेच सांगत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाडे पडलीत, तिथे कुठले काँक्रिीटीकरण झाले. आरे कॉलनीत कुठले काँक्रिीटरण झाले. पण अधिकारी व कंत्राटदाराने चुकीचे काम केले असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही. जी झाडे पडली, ज्या ठिकाणी ज्या कंत्राटदाराने एक बाय एक मीटरची जागा सोडली नसेल, त्यांना पुढच्या वर्षी कुठल्याही प्रकारचे कंत्राट दयायचे नाही म्हणजे नाही. या मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या जीवापेक्षा कुणीही कंत्राटदार मोठा नाही."


-गणेश खणकर, सभागृहनेते



मी चुकली असेल तर मी माझा राजीनामा द्यायलाही तयार…


"तुम्ही जर सुरुवात केली आहे तर मी त्यांचा शेवट करून दाखवेन. कोणत्याही कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचे काम आमच्याकडून होणार नाही. प्रसंगी आम्ही प्रशासनाला खडे सुनावण्याची ताकद आम्ही ठेवतो. आम्ही त्यांच्याकडून काम करून घेतो. आम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करायला जातो तेव्हा तुम्ही कंत्राटदारांवर जाता आणि कंत्राटदारांवर कारवाई करायला निघालो की आपण प्रशासनावर जातात. हे चालणार नाही, मी चुकली असेल तर मी माझा राजीनामा द्यायलाही तयार आहे. आम्हाला पदाचा मोह नाही. आम्ही प्रथम कार्यकर्ता आहोत आणि कार्यकर्ता असल्यामुळे कुठलीही घटना असली तरी मी प्रथम त्याठिकाणी पोहोचते, पण विरोधी पक्षातील कुणी तिथे पोहोचतो का? आमच्या कडे जेव्हा राजीनामा मागता तेव्हा आपल्या भूतकाळातही जरा झाकून बघा."


-रितू तावडे, महापौर

Comments
Add Comment

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर क्षम लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई