Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.



प्रादेशिक हवामान केंद्राने रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच सोमवार ३ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तर मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवार ५ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.



ज्या विभागांना पावसाचा इशारा दिला आहे तिथल्या नागरिकांना विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. यंदा अल निनोमुळे पावसाचं आगमन उशिरा झाले. पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम झाला. राज्यात अनेक ठिकाणी पाणीकपात जाहीर करण्यात आली. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले. पण हळू हळू पावसाचे आगमन झाले आणि परिस्थिती हळू हळू नियंत्रणात येऊ लागली. पण स्थिती अद्याप पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपात पूर्ण रद्द करावी किंवा कसे याबाबतचा निर्णय प्रशासन घेणार आहे.
Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात