Ketan-Siya Case : केतन-सिया प्रकरणात मोठा ट्विस्ट! या कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता ?

Mumbai : पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना सुरुवातीला एक अपघात मानली जात होती. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करून सत्य उघडकीस आणले. त्यांच्या तीन आठवड्यांच्या तपासानंतर हे प्रकरण एक भीषण आणि थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे समोर आले.तरुण व्यावसायिक केतन फक्त २५ वर्षांचा होता. त्याचे लग्न सिया गोयलसोबत ठरले होते. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात, पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधात अडर ठरत असलेल्या केतनची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.(Ketan Agrawal)



चेतन-सियाची निर्दोष सुटका होणार ?


लोहगड येथे केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप सिया गोयलवर आहे. न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी, पोलिसांना ठोस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि भक्कम पुरावे सादर करावे लागतील. कायदा मोठ्या प्रमाणावर परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून असल्याने, पुराव्यांची अखंड साखळी तयार करणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असेल. चिंताजनक बाब म्हणजे, या साखळीतील एक छोटीशी चूक देखील सिया आणि चेतन यांना फायदा मिळवून देऊ शकते आणि शिक्षेतून सुटका करून घेऊ शकते. त्यामुळे,हा गुन्हा न्यायालयात कसा सिद्ध केला जाईल यावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,केतनला कोणी ढकलले हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही आहे. जरी चेतन आणि सियाने कबुली दिली असली, तरी त्यांच्या दिलेल्या कबुलीजबाबांना न्यायालयात काहीही किंमत नसते,असे वकील तनवीर अहमद मीर यांनी सांगितले आहे. वकील तनवीर अहमद यांनी २००८ साली आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात तलावर कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करून त्यांना निर्दोष सुटका मिळवून दिली होती.



२००८ - आरुषी हत्याकांडसारखी परिस्थिती


आरुषी-हेमराज हत्याकांडात एका कुटुंबावर मोठ्या प्रमणावर संशय होता. त्यावेळी जनतेने त्यांना आरोपी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले होते. मात्र उच्च न्यायालयाने या निकालाल कायदेशीर तत्त्वांच्या आधारे रद्द केले.त्या प्रकरणात, खुनाच्या रात्री घरात कोणाही बाहेरच्या व्यक्तीने प्रवेश केला नव्हता, हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही. बचाव पक्षाने एक प्रबळ पर्यायी शक्यता मांडली की, तिसऱ्याच व्यक्तीने (जसे की कंपाऊंडर कृष्णाने) हा खून केला असू शकतो. बचाव पक्षाला कृष्णानेच खून केलाय हे सिद्ध करण्याची गरज नव्हती; त्यांना फक्त न्यायालयाच्या मनात वाजवी शंका निर्माण करायची होती.(Aarushi-Hemraj murder case)



मग केतन अग्रवाल प्रकरणात पुढे काय ?


पुणे पोलीसांना सर्व पुरावे न्यायालयात सिद्ध करावे लागतील. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा दुवा ती कडा असेल, जिथून केतन खाली पडला. किल्ल्याचा उतार, ती कडा, येण्या-जाण्याचा मार्ग आणि केतनचे बूट यावरून हा एक साधा अपघात (घसरणे) होता असे दिसते का? आणि जर त्याला ढकलले गेले असेल, तर ते मुद्दामहून ढकलले होते की वादावादी किंवा झटापटीदरम्यान अचानक घडले? पुणे पोलिसांना न्यायालयात खुनाशिवाय इतर सर्व संभाव्य शक्यता पूर्णपणे नाकाराव्या लागतील.लोकांनी सियाला दोषी ठरवले असले तरी पोलीसांना कोर्टाला ठोस पुरावे देण्याची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची